Best Marathi Shayari on attitude | Marathi Status On Attitude | best attitude quotes |Marathi Shayari on attitude 
Marathi shayari status on attitude
[ Marathi shayari status on attitude ]

मला चोरून बघण्याचा नको ना आव आणू तू
तुला मी पाहिले आहे मला निरखून बघताना

©ममता सपकाळ

=========================


करणार नाही तुझा तपोभंग कधीही 
तू साधू असल्याचा तेवढा आव नकोस आणू

© उज्ज्वला सुधीर मोरे


=========================


नकोस आणू आव सुखाचा संशय येतो आहे
तुझाच नाही मला स्वतःचा संशय येतो आहे

© विशाल ब्रह्मानंद राजगुरु  

=========================


हवा कमी झाल्यावर येतिल मूळ पदावर
आव आणती मगरीचा ज्या फुटकळ पाली

©गोविंद नाईक 

=========================मारण्याचा आव खोटा घेतला
मी कधी हातात गोटा घेतला ?
.
घ्यायचा नाहीच निर्णय कोणता
हाच निर्णय फार मोठा घेतला

©जयदीप विघ्ने

=========================


नुसताच आव नाही माझी समाजसेवा
मीही कुबेर जगतो झोळी जरी रिकामी

©अरविंद उन्हाळे 


=========================


आव हा आणू नका साहेब कैवारीपणाचा
दृष्टचक्रातून कोणी तारले माहीत आहे

©अमोल शिरसाट


=========================


शांत होते वाहताना पापणीही
आठवांचे ते नव्याने आव आता

©अलका देशमुख


=========================


उगाच खोटा आव नको
मी माझ्या जागीच बरा

©अश्विनी आपटे  

=========================


उगा ढेकराचा नको आव आणू
तुझी भूक पोरा भिडे काळजाला

©धनंजय तांदळे 


=========================


जो मनातून खूप असतो कोडगा
आणतो नुसताच भोळा आव तो

© ज्ञानेश्वर कटारे

=========================


टिकाया पाहिजे जर झुंड अपुली तर
ससा मारून आणू आव वाघाचा

©गणेश नागवडे

=========================


निळा कुणाचा भगवा,हिरवा झेंडा झाला
दिखावटी वर समानतेचा आव पांढरा

©हेमलता पाटील


=========================


विसरल्याचा आव उत्तम आणला आहे जरीही
नाव तू यादीत माझे टाकले नसणार नक्की

©जयश्री कुलकर्णी 


=========================


रोज आले मुखवटे लाऊन ते पण
आज त्यांचे आव मी उध्वस्त केले

वादळे घेऊन ते आले तरीही
आठवांचे ताव मी उध्वस्त केले

© जयदीप शरद जोशी


=========================


जरी मोठा न आवाका जिवाला आव मोठा दे
( नको छोटे शहर वसण्याकरीता गाव मोठा दे )

© डॉ.कैलास गायकवाड.

=========================


धाक, आदर तो दरारा लोपला
ते मिश्यांवर ताव नाही राहिले

©अझीझखान पठान

=========================


तो पाषाण हसतो मला वेडा कोण जाणतो मी
उगाच शहाण्याचा आव कश्याला आणतो मी

© किशोर_राजपूत

=========================


जरी वाटतो हा असा आव माझा
ठरविला कुठे मी हमीभाव माझा

©कालिदास चवडेकर

=========================दावण्या ताठा कशाला पाहिजे असतो कणा ?
बिनविषारी सापसुद्धा काढतो येथे फणा

©दत्तप्रसाद जोग  


=========================


तुझा ताठा , तुझी गुर्मी , तुझे मीपण दिसत आहे
तुझ्या उलट्या प्रवासाचे मला लक्षण दिसत आहे

© गोविंद नाईक

=========================


येणाऱ्या काळात प्रतिष्ठा ह्या वरून ठरणार म्हणे
तुझ्या मोडक्या इतिहासाचा तुला किती ताठा आहे

© वैभव  कुलकर्णी


=========================


तुला पुरुनी उरे मृत्यू तरी ताठा तुझा जादा
असे का एवढे कळुदे उभ्या जन्मात आयुष्या

© विश्वास कुलकर्णी

=========================


नम्रता गुण माणसाचा
केवढा ताठा मढयाला...

© गजानन वाघमारे

=========================


मी वाकणार नाही पक्के तिने ठरवले
गळला परंतु ताठा आयुष्य ओढताना

© कविता क्षीरसागर


=========================


पाण्यासवे पिठाचा,घाटा मिळून गेला..
देहास या तरीही, ताठा मिळून गेला.

©किरणकुमार मडावी 


=========================


गोडवे गायिले... मैफलीत मी अन्
काय माझा…. बडेजाव होत गेला

©अभय यादव  


=========================


आकाशाचा बघतो आहे निमूट मी बेगुमान तोरा
पतंग माझा कुठे दिसेना,झुलतो आहे नुसता दोरा

चंद्रशेखर सानेकर.

=========================


प्रतिष्ठा, प्रशंसा, बडेजाव हा 
किती चोचले जीवनाला हवे..

©गजानन वाघमारे.


=========================


हा व्यर्थ, मला सांग , बडेजाव कशाला
आताच भविष्यास , नवा घाव कशाला
.
हे श्रेय तुझ्या पूर्वसुरींचेच असे , तर
तू सांग, मिशीवर तुझिया ताव कशाला
.
आधीच सजा काय मिळावी , जर ठरले
'मिळणार तुला न्याय' , असा आव कशाला

©कलीम खान 


=========================


थाटू सुखाने संसार निळ्या नभाखाली
आणू नको उसना आव कधी तू कुणाचा

©मधुराणी बनसोड 

=========================


शेतकऱ्यांच्या बांधावर गळफास टांगला
मुजोर सत्ता ताव मारते उभ्या पिकावर

©मधुसूदन नानिवडेकर 


=========================


खरे बोलते मी कुणा भीत नाही
फुकाचा उगा हा मला ताव नाही

©डॉ.मीना सोसे 


=========================


[ Marathi Shayari Status On Attitude ]
Marathi shayari status on Attitude
[ Marathi shayari on attitude ]


तो-यात कोणत्या रे जगतोस माणसा तू
तो-यात जन्म जातो फसतात लोक सारे

©मनोज सोनोने


=========================


सौख्य, ऐश्वर्य, बडेजाव मिरविते दिवसा
केवढे भग्न, किती नग्न शहर रात्रीचे

©मिलिंद छत्रे. 


=========================


बदलली आहे दशा सा-या जगाची
की नव्याने आणलेला आव आहे

©निर्मला सोनी 

=========================


मौन झाल्या अंतरीच्या वेदनाही
चेहऱ्यावर व्यर्थ हसरा आव आहे

©निशा डांगे 

=========================


पुरा उतरेल हा ताठा पुन्हा येशील ताळ्यावर
जिवाचे रान झाल्यावर जगाचे भान आल्यावर

© निशांत पवार


=========================


मी ऐकले, तू म्हणतोस, बोललोच नाही
बोलूनही न बोलल्याचा आव करून गेला

© प्रिती_जामगडे


=========================


गडगडाटी करत येतो आव मोठा बरसण्याचा
रूसली का देव आजी दळण आता दळत नाही

©प्रतिभा गुजराथी 


=========================


अचानक का कमी झाला उन्हाचा ताव समजेना
असावी मानली का हार बघुनी झाड फुललेले

©प्राजक्ता पटवर्धन

=========================


पाहिले तू., चोरुनी मज
जिंकल्याचा आव झाला

©राम गायकवाड 

=========================


मानभावी वागणे, सदा ताठा त्याचा
हात हाती घेत सोडला जाता जाता

©रजनी अरणकल्ले 


=========================


सलामीचा तिरंगा हा नसावा हुक्मतीसाठी
खुला दरबार शिवबाचा स्मरतांना खरा ताठा

©सीमा गादे 


=========================


नसो देवा कधी ताठा तुझे ऐश्वर्य मिरवाया
पुरे काळा मणी होवो विकारी स्पर्श टाळाया

सुखावर ताव माराया युगेही धावली होती,
थांबला श्वास माझा अन् काळही थांबला होता

© राजीव मासरूळकर


=========================


मला सोडवेना.. तिला आवडेना.
फकीरा प्रमाणे बडेजाव माझे !

रविप्रकाश चापके


=========================


लावण्याच्या उंचवट्यावर मिरवत तोरा
चंद्रालाही लाजवणारे असते कोणी

©राधा भावे.

=========================आव खोटा नावडीचा चेह-यावर आणलेला
हात हाती लांब वाटा ,आवडीने चालताना

©स्वाती शुक्ल 


=========================


कधीही सभ्यतेचा आव मोठा आणला नाही
तुझ्याशी बोलते आहे इरादा चांगला नाही

© स्वाती शुक्ल.

=========================


ऊंच वृक्षास शोभतो ताठा
नम्रता शोभते लव्हाळीला.

©सतीश दराडे 

=========================ती तशी भाबडीच आहे पण
आव थोडा बळावला आहे.

© सतीश दराडे

=========================


Marathi shayari status on attitude
[ Marathi shayari status on attitude ]

सौंदर्यावर कधी स्वतःच्या त्याला तोरा,ताठा नसतो
रानफुलाच्या देठावरती कुठे बोचरा काटा नसतो

©शिव डोईजोडे


=========================


आग रामेश्वरी; बंब सोमेश्वरी
आव हा केवढा हातवारे किती

© श्रीपाद जोशी 


=========================


आव आणू नकोस साधूचा
दान भिक्षा म्हणून घेताना

©डॉ .स्नेहल कुलकर्णी 


=========================


बडेजाव तर प्रत्येकाचा दुनियेपुरता ठरलेला
आत्मा धरतो कधी कुठेही धारेवरती अजूनही

© सानिका दशसहस्त्र


=========================


तुझी राधिका मी मला गर्व वाटे
मनी भावनांचा बडेजाव आहे

© स्मिता_साळवी ‎ 


=========================


नशीबास माना उगा ताव नाही
सुखाच्या क्षणांची मला हाव नाही

© सौ. स्मिता जोशी जोहरे 


=========================


काल कासव जिंकले अन् हारला होता ससा
मोह,ताठा वा भुकेने नाडला होता ससा

©संतोष वि. कांबळे 


=========================सुंभ जळला पीळ गेला हा तरीही
मार देती हे मिशीवर ताव सारे

©विनोद बुरबुरे 


Post a Comment

0 Comments