Marathi Shayari On Love| Love status in marathi |marathi Love quotes|[ Marathi shayari on heart  ]
कधी बाहेरुनी येते कधी आतून येते
कसे येणार हे वादळ कुठे सांगून येते


तुला ना एकटे वाटो कधीही चालताना

तुझ्या रस्त्यावरी काळीज मी ठेवून येते...

©ममता सपकाळ 


| Marathi shayari on heart |


नाटकातही पात्र नटीचे
चौकटीतल्याच चौकटीचे


काळीज ठेव ना बाजूला

घे निर्णय तू अटीतटीचे...

अमित वाघ.

वार दुःखाचा जिवाच्या पार झाला.

वेदनेचा खोलवर विस्तार झाला

.
कापले गेले तिचे काळीज मित्रा
शब्द माझा खंजीराची धार झाला....


©अमोल शिरसाट

अस्वस्थ वेदनांनो घ्या काळजी जराशी,

काळीज फक्त माझे ठेवू नका उपाशी…


© अनिल विद्याधर आठलेकर

याचीच तर, मज वाटते रे काळजी

माणूस मरतो पण न मरते काळजी

.
जातील तोडुन काळजाला शेवटी
केली कितीही काळजाने काळजी....


©अब्दुल लतीफ लतीफ शेख

बोलके झाले जरा काळीज माझे

अक्षरे सारीच झंझावात झाली ...


©गवि.मिटके

काळजाला तोडणारे नाव बोलू नंतर,

दु:ख, जख्मा, वेदनेचे घाव बोलू नंतर…


©गणेश नागवडे

काळजाला भावनांचे

नेहमी अस्तर असू दे

.
चेहरा राहो कसाही
पण हृदय सुंदर असू दे..


.©गजानन वाघमारे

काळजाला किती यातना स्पंदनांना विचारून घ्या

जीवघेणी किती वेदना आसवांना विचारून घ्या...

©किशोर बळी

माझी हरेक वस्तू माझ्या घरी परंतू;

काळीज ठेवले मी त्याच्या खिशात आहे…


©ममता सपकाळ

कुठे पडणार आहे का फरक त्याला?

तुझेही सांग उत्तर बेधडक त्याला

.
फुटेना काळजाला आजही पाझर
अता बोलून पाहू का खडक त्याला ?...


©मनीषा नाईक

हा धूर कशाचा येतो ? ही आग कुठेशी जळते ?

की हृदय कुणाचे आहे काहीही समजत नाही

.
ही वस्ती पाषाणाची, काळीज कुणाला नाही
माझ्यासम कोणी नाही, कोणीच तुझ्यागत नाही…

© नितीन भट.


[ Marathi shayari on heart  ]काळजाला काळजाने काळजे चिरतात हल्ली

दानवांचे चेहरेही ...मानवी दिसतात हल्ली...

©प्रशांत वैद्य

घाव सुद्धा वाटतिल नक्षीप्रमाणे

फक्त लेणी पाहिजे हृदयात अपुल्या...


©राधिका सूर्यवंशी फराटे

काळीज अता कोणाचेही चरकत नाही

म्हणून मी या जखमा माझ्या मिरवत नाही..

© रावसाहेब कुवर.

ह्या लेखणीस माझ्या प्रतिसाद छान येतो

साधेच शब्द माझे भिडतात काळजाला

.
मी तज्ञ फार नाही ....नाही हुशार आहे
पण शब्द लेखणीचे.. चिरतात काळजाला...

©रजनी निकाळजे

कुठल्याच फुंकरीची नाही मला अपेक्षा

काळीज फाडणारा कुठलाच घाव नाही…


© ऋषिकेश दिपक ढवळे


ठेवून काळजाला शिंक्यावरी घरी अन्

मग सांत्वनास माझ्या आला रुमाल होता...


श्रीकृष्ण राऊत

डोळ्यांमधून गळते वाळू तुझ्या स्मृतींची

काळीज का तरीही रेताड होत नाही...


©सतीश दराडे. सतीश दराडे

रोज डोळ्यांनी मला ओवाळते ती

काळजावर काजळाचे वळ उठावे

.
मी कितीदा तोलतो काळीज माझे
पण तुझ्या वजनात हे केव्हां भरावे ?....


© सुधीर सुरेश मुळीक

काळजाला फारसे कळण्याअगोदर

चल निघूया पावले अडण्याअगोदर…

© सदानंद बेंद्रे

इशारा लाजरा कळतो मला मी बावळा नाही

मला काळीज आहे लाकडाचा ठोकळा नाही…

© सदानंद बेंद्रे

कोरलेस हृदयावरती तू अमरप्रीतिचे गोंदण
कळिकाळाचीही कोठे पुसण्याची ताकद आहे ?


ती गेल्यावरती मजला अंतराच सुचला नाही

काळीज डायरीमधले हे अधुरे धृवपद आहे…

© शुभानन चिंचकर (अरूण).

पापण्यांशी पूर का हे आसवांचे

फाटते काळीज हे देहात आता…

©श्रीपाद जोशी

खोल काही आत तुटल्यासारखे

काळजाचे देठ खुडल्यासारखे

.
वाजते श्वासात शहनाई जणू
वाटते प्रेमात पडल्यासारखे...

©संघमित्रा खंडारे

असा राग अन असा अबोला टाळाटाळ अशी

तरी कसे काळीज कुणावर रुसलेले नाही...


© वैभव वसंतराव कुलकर्णी

तोडले मी चौकटींना,पाळली रितभात नाही.

जिंकतांना काळजाला,पाहिली मी जात नाही….

©विजयालक्ष्मी वानखेडे

येते कशी गझल ही सारे सवाल त्यांचे

आतून गझल येते काळीज फाटल्यावर ..

©विश गोसावी.

असतो तुझा इरादा नुसताच पाहण्याचा

काळीज मात्र पुरते भांबावते बिचारे....


© योगिता पाटील
Post a Comment

0 Comments