Ukhane Marathi shayari | love marathi shayari | marathi ukhane status |
[ Ukhane - Marathi shayari ]|मराठी उखाणे शायरी |जन्म एखादी अशी जागा रिकामी ठेवतो की
जुळविता येतो उखाणा नाव घेता येत नाही... 

©सतीश दराडे


कुणी ऐकले का..? उखाणे उन्हाचे
म्हणे, सावली लाजली सांजवेळी...

© पूजा भडांगे लगदिवे नाव टाळुनी तुझे 
मी उखाणा घेतला...

©प्रफुल्ल कुलकर्णी.तुझे लाजणारे सुखाचे शब्द घेतो
मुखाला सुचेना उखाणे सांजवेळी...

©वराडे पु गकधी न ओठात नाव माझे
मनात असती सुरू उखाणे....

©रवींद्र ठाकूर.लखलाभ मोगऱ्याचे तुजला तुझे घराणे 
सांगून आज आले ..मज जाइचे उखाणे...

©ऋषभ कुलकर्णीहजार वादे करून झाले
तिच्या न ओठी तरी उखाणा..

©राजेश देवाळकरशब्द तसेही अबोल होते जरी लाजरे होते
पण डोळ्यांनी खुणवित होते एक मधूर उखाणे...

©रवी पांडुरंग.पुन्हा घेत जावा नव्याने उखाणा
पुन्हा जाणवावे, तुझे नाव नाही...

रसिका कुलकर्णी  किती घेतले इथे ऋतूंनी तुझे उखाणे..
तुझ्याच ओठी आले नाही नाव फुलांचे... 

©रुपेश देशमुखइथे मीच आहे , हळूवार घे ना. .
तुझ्या आवडीचे उखाणे वगैरे...

रुपेश_देशमुख.जोडवी पायात  कुंकू शोभते भाळावरी
लाजतो ओठी उखाणा केवढे आहे बरे...

राधिका_फराटे.उखाण्यात जेव्हा तुझे नाव येते अहाहा कसेसेच होते उरी
सरी सांडती पावसाच्या उन्हातच तसा खेळ दोघात रंगायचा..

©राधिका_फराटे.ती लाजता लाजता  घेते हळूच उखाणा
तुझं नाव घेण्यासाठी तिला लागतो बहाणा... 

Radhika Prem Sanskar 

कळाले का उखाणा घेत असताना
तिथे माझ्यामुळे का गेयता येते... 

सतीश दराडे.तुझ्या हासण्याचे दिवाणे किती?
तुझे चाहते कोण जाणे किती!
.
मला नाव माझे स्मरेना प्रिये;
तुला पाठ झाले उखाणे किती.... 

डॉ.श्रीकृष्ण_राऊत.उखाणे तिचे ते किती गोड होते
नको गोडव्याला निखारे उन्हांनो...

संदीप देशमुख गणोजेकर.तिचा उखाणा ऊदासवाणा
नसे हवाला खुशामतीचा...

©सीमा गादे घेतला नवखा उखाणा काळजातुन
घातला गुलकंद वाटे त्या स्वरातुन..

©सीमा गादे किती क्लिष्ठ सारे मनाचे उखाणे,सरळ सापडेना कशाचेच उत्तर
कधी उत्तरांची दिशाभूल होते,कधी प्रश्न काही निमूट अन् निरूत्तर....

©स्वाती शुक्ल.तुझा हात हातात आहे तरीही
तुझे नाव माझ्या उखाण्यात नाही...

©स्वाती शुक्ल इतके आले नाव तिचे की
माझे शेर उखाणे झाले....

©सुधीर मुळीक.न नजरेत ठसलो कुणाच्या कधी;
कशाला हवा तुज उखाण्यात मी....

©श्रीराम गिरी घेतले नाव माझे उखाण्यात तू...
पाहिले काय गे या दिवाण्यात तू,,

©संदीप वाकोडे अवचित खुळखुळे नाणा
रूपयाचा बांधिल उखाणा

 |मराठी उखाणे शायरी |घेतला मीही उखाणा आग्रहाच्या शेवटी
संपवीली अन कृपेच्या भाकिताची गोष्ट मी...

©अनंत नांदुरकर खलीश.काय मृत्यूचा तिने घ्यावा उखाणा...
ही घरी बसली वयाची पोर देवा.....

©अमित वाघ, अकोला.मनातले थेट नेमके बोलतात काटे
कधी न सुटतात पण उखाणे फुलाफुलांचे...

©आनंद पेंढारकर.घेवू कसा उखाणा ओठात नाव आहे
केलास काळजावर नाजूक घाव आहे..

© अश्विनी विटेकरकरण्यास फक्त थट्टा, नव्हता तुझा उखाणा ....
तू घेतलेस नक्की, ठरवून नाव माझे...

©अभिमन्यू आठलेकर.जात धर्माने कदाचित,भेद केले नसते
आज उखाण्यात तूझ्या,नाव माझे असते...

©अरविंद पोहरकरउखाणा घ्यायच्या वेळी जरा सांभाळ ओठांना
नको ते व्हायचे कोडे चुकुन नावात आलो तर...

©बंडू सुमन अंधेरे.गुलाबी मनाचे गुलाबी उखाणे
गुलाबी मनाला गुलाबी बहाणे....

©बालाजी टेंकाळेतिला जाच त्याचा असू दे कितीही
तरी नाव त्याचे उखाण्यात आहे ..

.©चंद्रकांत सिरसकर जवळून रोज जातो पडते तुला उखाणे
मी फक्त बोलण्याचे धुंडाळतो बहाणे
.
शोधून सापडेना संदर्भ कोणताही
नाते तुझे नि माझे इतके जुने पुराणे....

©दत्तप्रसाद जोग.भोवती आहे कुणाचा पिंजरा
घ्यायले कुठले उखाणे पाखरू...

©दास पाटील.का अजून सरले नाही चांदणन्हाणे 
का अजून कोरत बसला चंद्र उखाणे ..

©दास पाटील.का अडावे नाव माझे नेमके ओठात तेव्हा
घेतले ओठात जेव्हा तू उखाणे पावसाचे

©दास पाटील.बेधुंद प्यायलो मी सारे शराबखाने
तु का उगाच घेशी माझे तरी उखाणे...

©दिनेश मोडोकार.कुणी बैरागवासी देहभर फिरतो
विरक्तीचा उखाणा मग मला सुचतो...

©गणेश नागवडे.

 [ मराठी उखाणे - शायरीघे उखाण्यात अन,गोंद भाळी तुझ्या,
नाव बाकी कुठेही नको वापरू...

©गोपाल मापारी उखाण्यात माझे सहज नाव घेते..
बघा नाव माझे तिला भाव देते..

©हनुमंत येवले जुळलेले सूर बदलता, कंठातच रुसले गाणे
हे जीवन आता जैसे, विधवेचे करूण उखाणे ...

©कलीम खान.सखा तू असावा हयातीत माझा
सरळ बोलते मी उखाण्यात नाही...

©काश्मीरा पाटीलतू मला सुचलीच नाही
मग कसा घेऊ उखाणा...

@किशोर मुगल नको नाव गुंफू उखाण्यात माझे
तुला गुंफिले हाय श्वासात आहे...

©मधुसूदन नानिवडेकरनजर भेटताना, हळू घे उखाणा,
मुक्या काकणाला, जरा सांग बाई....

©माधुरी चव्हाण जोशी.चल पुन्हा एकदा उखाण्यात बोलू
मनाचे भेद सारे पापणीने खोलू...

©मधुराणी बनसोड नाव तुझे बघ उखाण्यात दडले
नव्याने सजले तर कुठे बिघडले...

©मधुराणी बनसोडघेतला साधा उखाणा
मी सजा.ती कैदखाना...

नाना_बेरगुडे.नको वेळ घालू इशार्यात आता
जरा नाव घे तू उखाण्यात आता...

©नितीन देशमुख  घे अता पटकन उखाणा साजणे,
ऐकण्या सारेच येथे थांबले..

.©निखील चोपडे.लगबग करू नको तू झुलतात ठाव माझे,
साधाच घे उखाणा साधेच नाव माझे...

©प्रशांत जामदार.अशी कितीदा तू पुटपुटली असशील उखाणा स्वप्नाळू
उखाण्यातली तुझ्या मला जागा भरण्याची ओढ लागली ...

.©प्रथमेश तुगांवकरपुन्हा सांगण्या एक उखाणा
त्यात बरसे केविलवाणा...

शरद देवरायतुझी चाखली जिंदगी चव जशी मी
सुचू लागले मध्यरात्री उखाणे...

श्रेयस जमखिंडीकर.जावे कुणाच्या अंगणा
कुणा घालावा उखाणा...

संजय शिंदे.घेते उखाणा वेदना कुणाचा
येते उचकी जखमेस नेहमी...

श्रीहरी नामदेव जाधव.रोज मनात उमटे
माझ्या एकच प्रार्थना
.
तुझ्या ओठास स्फुरावा
माझ्या नावाचा उखाणा...

तुष्की नागपुरीइतकीच चूक केली की मी नाव घेतले नाही
ज्या कुण्या एकट्यावरती एवढे उखाणे केले…..

©वैभव कुलकर्णी  उधळला डाव कोणाचा.. उजळले गाव कोणाचे
उखाणा घेतला तेंव्हा सजवले नाव कोणाचे ?....

विश्वास कुलकर्णी.उखाणा घ्यायचा आहे तुला जर आज प्रेमाने;
सखे तू नाव घे माझे नको होऊस लाजाळू....

विशाल राजगुरू.जसा पुढे काळ जात जातो तसे बदलती विचार सुद्धा
नवीन साचा, नवीन उपमा, नवीन पद्धत, नवे उखाणे...

विशाल राजगुरू.कुलुपबंद होते अधर कोरडे पण ..
उथळ पापण्यांनी उकलला उखाणा...

विनोद अग्रवाल.असती माझे जुनेच गाणे
तुझे सांग तू नवे तराणे
.
बघता तुजला सुचती मजला
गोड, लाजरे, नवे उखाणे....

©वैश मिर्झापुरे.झुळक गोड केवढी, घेत आहे ताना
सावलीने घेतला उन्हाचा उखाणा..

© उज्ज्वला सुधीर मोरे 

Post a Comment

0 Comments