आभासी_मायावी_मृगजळ


ध्यास मृगजळ,साथ मायावी तुझी
खातरी जन्मा कशी द्यावी तुझी ?

© अल्पना देशमुख-नायक

युद्ध मायावी असे की डोळसांनी अंध व्हावे
संजयाची थोर प्रतिभा दृश्य खोटे दावताहे

©अजय पांडे 

पैसा-पैसा करत धावतो, माणूस आहे आज
फकीर सांगे, मृगजळ ते, त्याचा कैसा माज

©अशोक कुळकर्णी 

दुःख सारे माळले मी
धर्म सारे पाळले मी
,
दूरचे पाहून मृगजळ
का अशी रे भाळले मी

©अलका देशमुख 

मृगजळ महाग झाले ओसाड जीवनी तर
स्वप्नी फळा फुलांचे यावे कशास कोकण

©डाॅ अमिता गोसावी 

हरतो थकून जातो मोहात गुंतता मी
पळवून मज सुखाचे मृगजळ खुशीत असते

© अभिजीत काळे ,

राणीसुद्धा दासी आहे का ?
ही दुनिया आभासी आहे का ?

©बाळ पाटील 

शुष्क एवढे वाळवंट आधी नव्हते
पाणी सगळे मृगजळ पिऊन गेले का

© चंद्रशेखर सानेकर

एक मृगजळ नवेच खोदूया
आणि त्याच्यात मग बुडू आपण...

©दास पाटील 

दृष्टीवरी कुणाच्या इतके धुके नसावे
पाण्यामधून सुद्धा मृगजळ दिसेल नंतर

© दास पाटील

समोर अपुल्या जो दृश्यांचा पापुद्रा पडतो आहे
आभासांचा चकवा आहे काही नाही त्यानंतर

©गणेश नागवडे 

तुझी वाळू तुझे मृगजळ तुझी झाडे कुठे न्यावीत मी
तुझे व्याकूळ जंगल त्यातली हरणे कुठे न्यावीत मी

©गणेश नागवडे 

तहान मृगजळ दोष कुणा मी देतच नाही
घेउन फिरलो मी नशिबाचे फुटके प्याले

©डॉ. गजानन मिटके 

ओलाव्याच्या मागे तृष्णा जात राहिली
नंतर कळले ते तर अधरामधले मृगजळ

©हेमलता पाटील

दररोज नव्याने 'पहिला' मर मर मरतो
आभासी 'दुसरा' जीवन जगतो आहे

© हेमंत राजाराम

अगतिक झालो अपंग झालो
कुबेर असुनी भणंग झालो
.
मृगजळ सागर सभोवताली
मीही फसवा तरंग झालो.

©इलाही जमादार 

मी रणरणत्या उन्हात माझी तहान घेवुन
मृगजळ शोधत व्यर्थ धावलो, असे वाटते

©जनार्दन केशव म्हात्रे 

मायावी चुगली हळूच घुसते कोणासही चावते ;
कानाला खुपते , मनात सलते , ती आगही लावते

©खलील मोमीन 

आभासी या दुनियेला का भुलून जातो आपण
हवे नको च्या हिंदोळ्यावर झुलून जातो आपण

©काश्मिरा पाटील

लांघता आल्या मला ना,वास्तवाच्या चौकटी,
लोक आभासी जगाची,गोष्ट सांगत राहिले.

©माधुरी चव्हाण जोशी 

ह्या निराशेची तरी भागेल तृष्णा वाटते
चालुनी दमलो तशातच लागले मृगजळ पुन्हा.

©मिलिंद छत्रे 

तू जसा दिसतो तसा नसतोच बहुदा जीवना
एवढ्यासाठी तुला मृगजळ म्हणावे लागते

©नितीन देशमुख 

सारखे दिसते मला मृगजळ कशाला
वाळवंटाच्या घरी हिरवळ कशाला

© निलेश कवडे

नवीन नाती विणली गेली इतुकी आभासी की
धागा तुटला तरी कळेना की तो तुटला आहे

©नजीम खान

जाहले तुझे अन् माझे आकाश निराळे आता
घे खुशाल तू ओढूनी मायावी जाळे आता.

©प्रशांत  वैद्य 

जिथे तेथे तुला मृगजळ कसे दिसते ?
उन्हाळा लागला आहे तुझ्यासाठी ?

 ©रूपेश देशमुख 

आभासी जगणे आणिक व्यवहार शून्यता अपुली
एक ठोकळा लावाया धड जागा गवसत नाही

© राहूल गडेकर 

धरेवर कोसळे अंबर झटकले पंख केवळ मी
नको माझ्या पळू मागे हवेला सांग मृगजळ मी 

©रवीप्रकाश 

’अर्धा प्याला भरलेला’ हा विफल दिलासा कुठवर घ्यावा ?
तहान भागत नाही तरिही ओठ भिजवुनी काय होतसे..?
.ㅤ
विकट वाकड्या परिस्थितीवर उपाय करण्या प्रयत्न नाही,
मृगजळ पाहुन धावत जाता घडे जमवुनी काय होतसे..?

© स्वामीजी निश्चलानन्द

तीच काहिली तीच होरपळ या जन्मीही
कोळुन कोळुन प्यालो मृगजळ या जन्मीही

©सतीश दराडे

ही अथांग सागरमाया मायावी आहे
मज सगळ्या नात्यांची वाळू ठावी आहे.

© सतीश दराडे

जोवर अपुल्या रक्तामध्ये रग असते
तोवर अपुले मायावी हे जग असते

©संदीप वाकोडे 

ओंजळीतून माझ्या कसे सांडते ?
रोज मृगजळ तुझे वेचताना शपथ

© जाधव श्रीहरी नामदेव

माझ्यामध्ये हिरवळ बघतो
वेडा आहे मृगजळ बघतो

©सूरज येलगुडे 

राग कधी येतो माझा, केव्हा हसतो मी माझ्यावर;
कळते की ते मृगजळ तरिही त्याच्या मागे पळतो मी

©विशाल ब्रह्मानंद राजगुरु 

मृगजळ क्षणात होते, डोळ्यांसमोर गायब,
फसलोय मी कितीदा फसवून घेत आहे

©विजय भिकू उतेकर 

सुख सारे मृगजळ होते ज्यासाठी वणवण केली
दे चूड मला शेवटची मी शांत निजावे म्हणतो

©विनायक पाटील 

पुन्हा चुकवून आले मी तुझ्या वाटेतले मृगजळ
कशाला घ्यायची भलत्या ठिकाणी धाव आयुष्या ?

©वैशाली शेंबेकर मोडक 

संकलक/संग्राहक : ©देवदत्त संगेप

Post a Comment

0 Comments