marathi Love shayari | marathi love status | marathi Love quotes |


जसा आहे तसा आहे
हवा तर घे असा आहे
.
बदलता मी ऋतू नाही
विचारांचा ठसा आहे..

©अनंत नांदुरकर खलिश

तो ऐसा हंगाम फुलांचा अता कुठे
ज्यासाठी मी हसत करावे हार मला .

©अनंत नांदुरकर ‘खलीश.

नशाही फुलांची, उतारा फुलांचा
तुझा स्पर्श नुसता शहारा फुलांचा
.
ऋतू याहुनी आणखी काय मागू?
असो बारमाही नजारा फुलांचा..

© आठलेकर

असा हा ऋतू अन असा गारवा,
तुला आणखी काय मोसम हवा?...

©अनिल आठलेकर

ओशाळले ऋतू अन भांबावल्या दिशा
केला तुझ्या मिठीने इतका कहर पुन्हा...

अनिल विद्याधर आठलेकर


तुझ्यविना या सहा ऋतूंचे काय करू मी
ऋतू सातवा होवू आपण ..पुढल्या जन्मी…

©ममता सपकाळ

भकास झाले हसरे अंगण , तू गेल्यावर
किती पोरके झाले जीवन , तू गेल्यावर
.
हळू हळू मग पसार झाले मोसम सारे
नयनी उरला नुसता श्रावण ,तू गेल्यावर...

©मसूद पटेल

पाहून मोसमाची बेमान रीत आता
विसरून पार गेलो पाऊस गीत आता…

©मसूद पटेल

छान प्रेमळ बोलका संसार करुया
चल जराशी जिंदगी चवदार करुया
.
पेरुया हृदयात मानवता ऋतूंच्या
ईश्वराचे स्वप्न हिरवेगार करुया …

© निशब्द देव

कशाने धुके सांग गंधाळले?
कुणी अत्तराचे दिवे जाळले?
.
कुणी बांधले चाळ पायी ऋतूंच्या
निळेगर्द आभाळ वेल्हाळले...

@ नितीन भट

एकावेळी दोन ऋतू माझ्यावर चालुन आले
शरद चांदणे घरात दारी वसंत कातर आहे..

©प्रशांत वैद्य 


वाच माझे मन सख्या तू आणखी काही नको;
हाच प्रेमाचा पुरावा वेगळी ग्वाही नको
.
पावसाची रम्य हिरवळ, अन वसंती रंगही;
पाहु दे सारेच मोसम.. वर्षभर लाही नको...

© #प्राजक्ता_पटवर्धन


ऋतू कोवळा येऊन जाता आठवतो तू
ऋतू सोहळा आटोपतांना आठवतो तू
.
सहा ऋतूंच्या स्मरणांच्याही पडता गाठी
ऋतूत एक होऊन ऋतू मग आठवतो तू ...

©रश्मी पदवाड मदनकर

रात्र का मलूल ही असून चांदणे;
ठेवले असे कुणी मिटून चांदणे
.
टाळले सुगंध पर्व,टाळले ऋतू
ओंजळीत घेतले भरून चांदणे...

©राधा भावे

या ऋतुंच्या उत्सवाचे मोल जर नाही तुला
का फुलांचे आणतो मग हे इथे झेले पुन्हा…

©राधिका सुर्यवंशी
 

ये मखमली ऋतूंचे होऊन सोहळे तू
स्पर्शात मोहरू दे आयुष्य बारमाही...

©रत्नमाला शिंदे


Post a Comment

0 Comments