marathi shayari on tea (chaha)|चहा वर आधारित मराठी शायरी


घ्या चहा आधी गरीबाच्या घरी
तो कडू किंवा बरा नंतर बघा...

©एजाज शेख  

जरी नाव त्याला दिले अमृताचे
चहा ढोसल्याने अमर होत नाही...

©बाळ पाटील 

चहा हॉटेलचा साधा कधी झेपायचा नाही
बसत जेवायला एकत्र सारे हीच स्वस्ताई...
©भूषण_कटककर 

उकळणाऱ्या चहाची माहिती होती 
हसू आले गरम किटली बघितल्यावर 

©गोविंद नाईक 

केवढी चर्चा उगाचच गाजला होता चहा
फार नाही फक्त सोबत घेतला होता चहा
.
आजही जाते तिथे मी आजही रेंगाळते
तू जिथे भेटीत पहिल्या पाजला होता चहा...

©मनिषा नाईक

आहे तसाच आणा काळा चहा गडे हो;
येथील दूध सारे बोके पिऊन गेले....

© श्रीकृष्ण नारायण राऊत.

संपताना वाटतो ना संपला लवकर चहा
पण पिताना वाटतो का?...बापरे! कपभर चहा
.
ऐकली होती चवीची मी तुझ्या जादूगरी;
घोट मीही घेतला अन पेटला तनभर चहा...

© सुहासिनी विवेकरंजन देशमुख

मनाप्रमाणे तिच्याच घडले सारे
'चहा' सुधा मग अर्धा अर्धा केला...

 ©शशिकांत कोळी(शशी)

एवढी असते कुठे गोडी चहाला
त्यातले माधुर्य हातातून येते...

©विशाल राजगुरू  

पाऊस अन थोडा चहा देहात थोडी शिरशीरी
घेऊ नको संशय उगाचच बेत आहे चांगला.

© योगिता पाटील

Post a Comment

0 Comments