२०० मराठी अंताक्षरी शायरी | marathi baitbaji shayari


उगाच जीवनावरी नको बसू रुसून तू
अनेक रंग गंध घे जगातले लुटून तू..... © #प्रकाश मोरे.
*
२.
तू दूर ढगांना सारित जा
ताऱ्यांना वाट विचारित जा.... © #कलीम खान.
*
३.
जाता जाता भरपूर रडत जा ना
काळ्यावरती हिरवे गिरवत जा ना .... © #चित्तरंजन भट.
*
४.
ना कुणी येथे कुणाचे खास आता
का कुणी घेतो कुणाचा घास आता .... © #बबन धुमाळ.
*
५.
ताण,चिंता, कटकटींची सारखी रिपरिप देवा
शब्द पेरायास आता दे जरा उघडीप देवा ..... © #शुभानन चिंचकर
*
६.
वादळांशी खेळण्याची सवय आहे
नाव माझे आठवा मी प्रलय आहे ..... © #प्रशांत वैद्य.
*
७.
हे शब्द जन्मलेले फाडून काळजाला
घे वाचुनी सखे तू जोडून काळजाला ... © #अनंत कदम.
*
८.
लाज तिच्या भेटीने आली आठवणीला
एकट वाटेवर घडलेल्या पांदणलीला .... © #बाळ पाटील.
*
९.
लाख झाले घाव माझ्या काळजाला,
भीत नाही मी तरीही वादळाला... © #शरद काळे धामणगांव.
*
१०.
लाखात पाहिला मी शिस्तीतला शिवाजी
फेकून मौन मारी संतापला शिवाजी ..... © #रवी प्रकाश चापके.
*
११.
जीवनाला वेदनेचा शाप आहे
सोसण्यावाचून जगणे पाप आहे... © #धनश्री आजनकर पाटील.
*
१२.
हे प्रकाशाचेच जुल्मी डाव होते
वात जळते अन दिव्याचे नाव होते .... © #प्रफुल्ल भुजाडे.
*
१३.
ते चांदणे बिलोरी माळून ये नव्याने
आभाळ भारलेले होऊन ये नव्याने.... © #हेमलता पाटील.
*
१४.
नेमकी आहे कशी शाळा बघू
केवढा आहे फळा काळा बघू..... © #राधिका फराटे.
*
१५.
घुसमटीचा दाबला माझ्या गळा मी
जाहलो बोलून सारे मोकळा मी... © #स्वप्नील शेवडे.
*
१६.
मी एकटाच येथे माझ्या जगात आहे..
त्यांच्या शहात होते त्यांचीच मात आहे.... © #स्वामीजी निश्चलानंद.
*
१७.
हे इथेतिथेचे चिंतन माझे नाही
माझे जगणेही माझे जगणे नाही.... © #अनंत ढवळे.
*
१८.
ही आस मृगजळाची दरमाणशी असावी
स्वप्नात रोज येते ती उर्वशी असावी.... © #बाळ पाटील.
*
१९.
वीज होउन चमकणारे दिवस आले
ढग कडेवर मिरवणारे दिवस आले.... © #हेमंत राजाराम.
*
२०.
लेकरा तू दु:खितांचा पामरांचा यार हो
माणसाला तारणारा मानवी आधार हो.... © #राम रोगे.
*
२१.
होय, थोडी खुळी पिशी आहे
भावते मी मला, जशी आहे... © #क्रांति साडेकर.
*
२२.
हेच होते ठोस कारण रक्तस्रावाला
गंध जातीचाच होता आडनावाला... © #निलेश कवडे.
*
२३.
लादली माणुसकी सगळ्या जगावर माणसांनी
पण मनाशी पाळले होते जनावर माणसांनी .... © #सुधीर मुळीक.
*
२४.
निरुपयोगी दवा व्यथेसाठी
द्यायची..दे दुवा व्यथेसाठी... © #निखील श्रीराम चोपडे खामगांवकर.
*
२५.
ठीक आहे पण करू मी काय त्याचे ?
लोणचे घालायचे का सांत्वनाचे ?... © #स्वप्नील शेवडे.
*
२६.
चेहऱ्यावर बेगडी ओघळ कशाला
तीळ असल्यावर हवे काजळ कशाला .. © #निलेश कवडे.
*
२७.
लाख सुखांची संधी मी भिरकवली आहे
कारण एक व्यथा कष्टात मिळवली आहे... © #सुधीर मुळीक
*
२८.
हे कधी माझ्या मना उमजेलही
पालवी फुटताच येते वेल ही…. © #गजानन मिटके.
*
२९.
ही मायावी,फसवी आणिक नकली दुनिया
अवघी नाही पण थोडीशी कळली दुनिया.... © #विनोद मोरांडे.
*
३०.
या जगाला मी पुन्हा विसरून गेल्याचा..
हा पुरावा काल तू भेटून गेल्याचा.... © #ममता सिंधूताई.
*
३१.
चारही नाही कधी चौघात येते ती
आजही माझ्या पुन्हा स्वप्नात येते ती.... © #प्रमोद खराडे.
*
३२.
ती लगबग भल्या पहाटे, ते सडा सारवण नाही
ही उंच इमारत नुसती, ते हसरे अंगण नाही... © #किशोर बळी
*
३३.
ही फसवणारी दलदल कशाला
अन् दुःखाचे भांडवल कशाला… © #अरविंद उन्हाळे.
*
३४.
लाचार कातडीचे जगणेच फास आता
येतोय चामडीचा आतून वास आता .... © #विजया गायकवाड.
*
३५.
ताठ कण्याला कधी वाकणे जमले नाही...
स्वार्थासाठी पाय चाटणे जमले नाही.... © #निलेश कवडे.
*
३६.
ही स्वभावाशी हणामारी कशाला
दाखवत आहेस दिलदारी कशाला.... © #वैभव कुलकर्णी.
*
३७.
लाट आली जरी न वाऱ्याने
दक्ष ऱ्हावे तरी किनाऱ्याने.... © #सिद्धार्थ भगत.
*
३८.
नेमकी विरहात येते जीवघेणी पौर्णिमा
एकट्या देहास माझ्या जाळणारी पौर्णिमा.... © #आनंद रघुनाथ.
*
३९.
मायबापाचे तुला भूषण असू दे ;
एवढेसे बस तुझे शिक्षण असू दे ...... © #निशब्द देव.
*
४०.
देहास बांधलेल्या काही अनाथ राती ,
विकतात यार येथे सर्रास रोज नाती..... © #माधुरी चव्हाण जोशी.
*
४१.
ती स्वतःला शोधते माझ्यामधे कित्येकदा
अन स्वतःला हरवते माझ्यामधे कित्येकदा.... © #एजाज शेख.
*
४२.
दाटले डोळे,नका सांगू कुणी हासायला;
ऐन वैशाखात येतो चैत्र का बहरायला?....प्राजु. © #प्राजक्ता पटवर्धन.
*
४३.
लाजिरवाण्या पापाची आठवण कितीदा
एका मोहापायी भोगू मरण कितीदा... © #आनंद रघुनाथ.
*
४४.
दारावरी पहारा ठेवून पांडुरंगा ,
भक्तास दर्शनाला केला उभा अडंगा..... © #श्यामनाथ पारसकर.
*
४५.
गाऊ नकोस गाणी इतक्यात पावसाची..!
असते बरीच फसवी सुरुवात पावसाची.... © #गोविंद नाईक.
*
४६.
चिखल कधी मी कोणाचाही तुडवत नाही
माझा कोणी,तुडवलाच तर धडगत नाही..... © #अमृता साळुंके जोशी
*
४७.
ही कुठल्याश्या स्मरणांवरची वीण उसवलेली आहे
ठसठसत्या जखमांनी माझी झोप उडवलेली आहे.... © #वैभव कुलकर्णी.
*
४८.
हे असे आभासवाणे चांदणे आता नको
चांदरातीला उशाशी, लाजणे आता नको..... © #गजानन मिटके.
*
४९.
कोण जाणे जीवनाचा कोणता हा बेत आहे
कोण माझ्यातून मजला दूर कोठे नेत आहे... © #लक्ष्मण उगले.
*
५०.
हे पुन्हा जाहीर झाले किती वाटते
बंदुकीला लेखणीची भिती वाटते..... © #किरणकुमार मडावी.
*
५१.
तेल माझे, वात माझी, तेवती तू समई आहे..
कुंचला माझा, कागद माझा, गर्द तू शाई आहे....© #सोमनाथ कोळेकर. *
५२.
हे बंध रेशमाचे सोडून टाकले मी
नावापुढील नावच खोडून टाकले मी... © #सौ.ज्योत्स्ना राजपूत.
*
५३.
मी घेतली कायम तहाची भूमिका
काही घडो ! माझी 'पहा' ची भूमिका... © #जयंत कुलकर्णी.
*
५४.
काळजातल्या हव्याहव्याशा त्रासावरती गझल लिहावी
गालावरून ओघळणार्या पाण्यावरती गझल लिहावी... © #काश्मिरा पाटील.
*
५५.
वीज होउन चमकणारे दिवस आले
ढग कडेवर मिरवणारे दिवस आले... © #हेमंत राजाराम.
*
५६.
लेवून सरींचे कोंदण तो मृदगंधाशी येतो
मी आठवणींच्या देही,टपटपतो, भिजतो गातो... © #गजानन मिटके.
*
५७.
तो न नुसता वावराचा सातबारा
आमच्या तो यातनांचा गोषवारा... © #संदीप वाकोडे.
*
५८.
राहिलो नाही जरी मी बाळ आता
पण तरी आई मला कुरवाळ आता... © #गणेश शिंदे दुसरबीडकर.
*
५९.
तारूण्याची तलफ शोधतो...
मी डोक्यावर कलप शोधतो... © #अमित वाघ.
*
६०.
तो तसा निर्लज्ज नाही लाजतोही
सभ्य आहे सांगतोही माजतोही.... © #डॉ.संतोष कुलकर्णी.
*
६१.
ही माणसे बिचारी आता जिवंत कोठे
त्यांना जगावयाला होती उसंत कोठे... © #वंदना पाटील वैराळकर.
*
६२.
ठेवली आहे मनाच्या आत प्रेमाने
माणसे सांभाळणारी जात प्रेमाने .... © #बंडू सुमन अंधेरे.
*
६३.
नेहमी फुटपाथला पाहून रस्ता
नाक अपुले जातसे मुरडून रस्ता.... © #शुभानन चिंचकर.
*
६४.
ताठ मानेची जरीही चूक नाही
जाणती पण कोणती बंदूक नाही ...#डॉ.संतोष कुलकर्णी.
*
६५.
ही उडाली देखणी झुंबड किती
श्वास घेणे चालले अवघड किती ..... © #पियुष खांदेश्वर.
*
६६.
ती जाताना... 'येते' म्हणून गेली
अन जगण्याचे कारण बनून गेली.... © #प्रसाद शिरगांवकर.
*
६७.
लिहिलेल्या ओळींची गझल झाली पाहिजे
सोसलेली वेदना सफल झाली पाहिजे ... © #दीपाली कुलकर्णी.
*
६८.
जे हवेसे वाटते ते मिळत नाही
जे नको असते कधी ते टळत नाही... © #प्रकाश मोरे.
*
६९.
ही काजळी झटकायला हवी
पणती पुन्हा उजळायला हवी.... © #वसंत शिंदे.
*
७०.
विधीच्या नाटकामधला खरा दीर्घांक पाहू या
जुन्या खेळातला पुढचा नवा एकांक पाहू या... © #कालिदास चवडेकर
*
७१.
या तुच्छ जीवनाला इतुकाच वर मिळावा
सेवेत शोषितांच्या बस देह हा झिजावा.... © #मसूद पटेल.
*
७२.
वावराचे स्वप्न हिरवे पैल नेतो
दु:ख मातीचे धुऱ्यावर बैल नेतो .... © #किरणकुमार मडावी.
*
७३.
तोडली तू सर्व नाती बस जराशा मी पणाने....
राहिले काही न हाती बस जराशा मी पणाने.... .....#अमित वाघ.
*
७४.
नेहमी पाठीस जखमी एक खाज करते
भूक साध्या माणसाला पोतराज करते.....#किरणकुमार मडावी.
*
७५.
तेच ते आहेस तू सांगत किती
वेगळी आहे तुझी पद्धत किती.... © #जयदीप शरद जोशी.
*
७६.
तीच वळणे आजही अन त्याच रस्त्यावर,
केवढा होतो मनाला जाच रस्त्यावर..... © #ममता सिंधूताई
*
७७.
रगताचं पाणी करून कसला कापूस ...
आता कसा गुपचूप बसला कापूस... © #अरविंद उन्हाळे.
*
७८.
सकाळी सकाळी मी धुक्यातून चाललो
जणू शुभ्र सायीच्या ढगातून चाललो.... © #सिद्धार्थ भगत.
*
७९.
लोचन जेव्हा सजती त्यात तुझे काजळ मी
आठवणींचा गहिवर,त्यात विरह परिमळ मी.... © #हेमलता पाटील.
*
८०.
मी रोज रोज फाशी, घेऊ तरी कितीदा
या वेदना उरीच्या, सोसू तरी कितीदा....© #महादेव बागडे.....
*
८१.
दारात आसवांना बांधून बाप माझा
आहे बरीच दुःखे सोसून बाप माझा..... © #मनीष मालुसरे.
*
८२.
झाडे समस्त वरचढ सारी अशी सरस;
करतो फुले उन्हाची पण एकटा पळस.....© #नजीम खान.
*
८३.
सहज गमतीने खडा टाकून जातो काफिया
काळजाला केवढा ढवळून जातो काफि़या....© #राधिका फराटे.
*
८४.
यादीत चाहत्यांच्या तू नाव शोध माझे
पंखात पाखरांच्या तू गाव शोध माझे... © #भागवत बनसोडे.
*
८५.
झेप माझी अंबराला मी पुन्हा भिडवू कशाला
ते पहा उतरून आले भेटण्या माझ्या घराला.. © #भागवत बनसोडे.
*
८६.
लागता भांड्यास भांडे; शांतता टिकणार कुठवर?
एक धागा संशयाचा...लावतो नात्यास कातर... © #सुहासिनी देशमुख.
*
८७.
रस्त्याला चकवा इथल्या, पायांना थकवा आहे
झाडांना ग्लानी आणिक, पंखांना लखवा आहे... © #किशोर मुगल.
*
८८.
हे ही खरेच आहेत, ते ही खरेच आहेत.
छळतात हरघडी ते, तरीही बरेच आहेत.... © #प्रा.बी.एन.चौधरी.
*
८९.
तलवारिचा कसाही चुकवेल वार तो;
खोट्या तुझ्या स्तुतीने होईल ठार तो.... © #डॉ.श्रीकृष्ण राऊत
*
९०.
तोडली तू सर्व नाती बस जराशा मी पणाने....
राहिले काही न हाती बस जराशा मी पणाने.... ... ©#अमित वाघ.
*
९१.
नेमके आहे कुठे माहीत नाही घर मला ..
पाय ओढीने किती नेतात हे भरभर मला.....© #प्रथमेश तुगावकर.
*
९२.
लागला नाही सुखांना फोन मी लावून सुद्धा
रेंज नशिबाची पुरेशी लाभली नसणार बहुधा ....© #जयश्री कुलकर्णी.
*
९३.
धाडू नको आमंत्रणे, बेभानता नाही खरी !
उद्ध्वस्त होण्या वादळे नेतात का कोणी घरी....© #सुप्रिया मिलिंद जाधव.
*
९४.
रीत दैवी जाण रे तू माणसा
वागताना हो तुझा तू आरसा ...© #फातिमा मुजावर.
*
९५.
सावली जगास दे नि तू खुशाल सोस ऊन
झाडपण शिकून घे नि ठेव झाडपण जपून ...© #भूषण कटककर.
*
९६.
नभाच्या सारखा डोळ्यामधे पाउस
किती शेफारला...माझ्यामधे पाउस... © #निखील चोपडे खामगांवकर.
*
९७.
सर्व दु:खांवर उतारा ठेवतो
मी जिभेखाली निखारा ठेवतो....© #नाना बेरगुडे
*
९८.
तो ही आता बोलत नाही पूर्वीइतका
गंध न उरला नात्यालाही पूर्वीइतका....© #सानिका दशसहस्त्र.
*
९९.
काळजाला जाळणारी, माणसा आहे गझल
राख झाल्या माणसांचा, कोळसा आहे गझल…© #श्रीनिवास गेडाम.
*
१००.
लढा आजचा हा जरी हारलो मी
महायुद्ध जिंकायला जन्मलो मी… © #आत्माराम जाधव.
*
१०१.
मी मेल्यावर सखे एक कर
चढव पुन्हा मेंदी हातावर.....© #सुरेश शेन्डे
*
१०२.
रस्त्याने जाता जाता चिखलात पाय बरबटला
पुसू कुठे! प्रत्येक दगड जर शेंदूराने नटला.... #मिलिंद_छत्रे.
*
१०३.
लागेल कशी नाव तिरावर..
पाणी चढले जर डोक्यावर.....मनोज सोनोने.
*
१०४.
रहा अशीच अंतरी
खट्याळ ईश्वरापरी....हेमंत मधुकर डांगे.
*
१०५.
रीत जगाची या हृदयाला कळली नाही
हेच खरे की दुनियादारी कळली नाही....निर्मला सोनी.
*
१०६.
ही उडाली देखणी झुंबड किती
श्वास घेणे चालले अवघड किती ...पियुष खांदेश्वर.
*
१०७.
ती न याला हवी ती न त्याला हवी
दुर्बलाची अहिंसा कुणाला हवी ... कलीम खान.
*
१०८.
विटा, भिंती, जिने, छप्पर उन्हाचे
उन्हावर बांधले मी घर उन्हाचे....चित्तरंजन भट.
*
१०९.
चेहरा आहे खरा हा खंडणीचा
लावला आहे मुखोटा वर्गणीचा....पियुष खांदेश्वर.
*
११०.
चाणाक्ष ह्या हवेचा श्वासात धाक ठेवा;
चालेल जीव गेला,शाबूत नाक ठेवा.... @श्रीकृष्ण राऊत
*
१११.
वाट काट्यांची निरंतर चाललो मी
मग कुठे गावी फुलांच्या पोचलो मी....मसूद पटेल.
*
११२.
मी निरंतर वाट बघतो भेट ना वाटेत तू ,
वेळ जातो खूप माझा ये जरा वेळेत तू ....जयेश पवार.
*
११३.
तू चंदनाप्रमाणे झिजला अपार बाबा
केलेस तू सुगंधी अमुचे शिवार बाबा....प्रकाश मोरे.
*
११४.
बाप नावाचे उडाले मोसमी वार्यात छप्पर...
माय नावाचा किती मग सांडला पाऊस घरभर...गणेश शिंदे दुसरबीडकर.
*
११५.
रदीफ़ ना काफ़िया- अलामत, सुटेसुटेसे चुकार मिसरे
जुन्या वहीचे कवाड खोलुन खुणावणारे हजार मिसरे.... ..#क्रांति साडेकर
*
११६.
रेष कपाळावरील किंचित सरकत नाही
म्हणून माझ्या हातामध्ये बरकत नाही.... डॉ. कैलास गायकवाड.
*
११७.
ही फक्त घराण्यासाठी नावाला चळवळ आहे
रक्तात कुणाच्या कोठे उरलेली सळसळ आहे..... प्रकाश मोरे
*
११८.
हेच होत राहिले असेच होत राहिले
काजळामधील दुःख काजळात राहिले …..जयेश पवार.
*
११९.
लेकीच्या नावावर करतो,अख्या जगण्याला.
कर्ण जन्मतो बापामध्ये कन्यादानाला.....निशब्द देव.
*
१२०
लाल हिरवे केशरी किंवा निळे छप्पर नसो
जात आहे मी जिथे तेथे कुणाचे घर नसो...भूषण कटककर.
*
१२१.
सोसतांना एक गाणे गुणगुणावे
दाटलेले दु:ख ते विसरून जावे... ए.के.शेख.
*
१२२.
वेदनेचे गीत माझे एकदा ऐकून जा
भंगलेले स्वप्न माझे एकदा पाहून जा....नीता आंबेगांवकर.
*
१२३.
जाता जाता येव्हडे करजो आयुष्या ...
अंतरी प्रेमाचे रंग... भरजो आयुष्या....अरविंद उन्हाळे.
*
१२४.
या काळजात माझ्या आहे अमाप जागा
जर पाहिजे कुणाला तर मज खुशाल सांगा....आबेद शेख.
*
१२५.
गालावरी तुझ्या या खळी पडू नये
निष्पाप चार पक्षी बळी पडू नये.....पियुष खांदेश्वर.
*
१२६.
ये धर्मं पंडिता ये ... दे एवढेच उत्तर !
तू पाहिलाच नाही,...का सांगतोस ईश्वर ?...चंद्रशेखर भुयार बादशाह.
*
१२७.
रस्ता कधी तुझा हा चुकशील का पुन्हा तू?
वळणावरी जुन्या त्या दिसशील का पुन्हा तू?...#अनीता Anita बोडके
*
१२८.
तू तुझा सोडलास का हेका?
जे हवे ते तुला मिळाले का?...ganesh nagavde.
*
१२९.
काल जो व्यायाम केला कोणता तो योग देवा?
भेटला तू एकदाचा...काय योगायोग देवा....श्यामनाथ पारसकर
*
१३०.
वार आता पुन्हा काळजावर नको,
दे अगोदर सजा...भेटल्यावर नको....अनिल आठलेकर.
*
१३१.
कोणत्या नेमक्या कक्षेत फिरतो मी
सूर्य पृठी चंद्र असुनी पोरका मी ...अभिजीत काळे.
*
१३२.
मी सुगंधी तू सुगंधी, पोसतो ती रग सुगंधी,
संयमाला कोंब फुटता, तग सुगंधी, धग सुगंधी...पूजा फाटे.
*
१३३.
धीर धरावा सांगा कुठवर
जीव आतला कापे थरथर... डॉ.श्रीकृष्ण राऊत
*
१३४.
रक्त निघता माणसांचे
पेव फुटते जाणिवांचे...अमृता साळुंके जोशी.
*
१३५.
चेहरा खोटा असा का दावतो हा आज माझा
वाटते की आरसा झालाय धोकेबाज माझा...अनिता बोडके. Anita Bodke
*
१३६.
झालीच जर नजरानजर, भेटून जा, बरसून जा...
पाहून शेवटचे मला विसरून जा; बरसून जा....संजय गोरडे
*
१३७.
जाती पाती मानत नसतो खेळ भुकेचा
नात्यालाही वरचढ ठरतो खेळ भुकेचा....हेमंत राजाराम.
*
१३८.
चार दोन असावे नि एक दुःख च्यायला
काय लागते म्हणा इथे प्रसिद्ध व्हायला….वैभव कुलकर्णी.
*
१३९.
लावा खुशाल बोली विक्रीस गाव आहे;
चौकात मांडलेला अमुचा लिलाव आहे....श्रीकृष्ण राऊत
*
१४०.
हेतू मला तुझा तेव्हाच कळला होता
जेव्हा विषय माझा तू सहज टाळला होता ....अरविंद उन्हाळे.
*
१४१.
तापणारा तापतो अन मजवरी संतापतो
मी खुबीने ताप त्याचा धस्कटाने मापतो....गंगाधर मुटे.
*
१४२.
तोडून बंध सारे, आता जरा जगूया
नशिबा तुझ्या कलाने, आयुष्य पारखूया....अश्विनी आपटे.
*
१४३.
या विस्कटलेल्या घरट्यांचे काय करावे?
फांद्या तुटलेल्या स्वप्नांचे काय करावे?....अल्पना देशमुख नायक.
*
१४४.
वेदनांचा कुंभमेळा सारखा भरवू नको
मी तुला भेटेनही पण तू कुठे हरवू नको.. अनिल आठलेकर
*
१४५.
सात खिडक्या पुरेशा मी झाकतो तरी;
शिरते कशी कळेना ती स्वप्नसुंदरी..... #गंगाधर मुटे
*
१४६.
रीत मोडुनी बाई जेव्हा जगणे शकते
प्रत्येकाची नजर अचानक समाज बनते....मनीषा नाईक.
*
१४७.
ते वसंत जरी किती पाहिले जवळून मी
फक्त आठवता तुला , जातसे बहरून मी…वा.न.सरदेसाई.
*
१४८.
मीलनासाठी सखे तू बंधनांना पार कर
शक्य ते नसलेच तर मग कल्पनाविस्तार कर…आनंद रघुनाथ.
*
१४९.
रचली अमूल्य गाथा उकलून अंतरंगा
कळला कुणास तुकया वाचूनिया अभंगा?....अल्पना देशमुख नायक.
*
१५०.
गावाकडची विहीर अन् ती मोट पाहिजे
त्या गोड गोड पाण्याचा मज घोट पाहिजे....विश्वजीत दीपक गुडधे.
*
१५१.
जेवढाही जीवघेणा वार होईल
तोच तर मग शेवटी आधार होईल.....पियुष खांदेश्वर.
*
१५२.
लगबग वळणीवरचा आवरी पसारा
काचेवर चमके नितळ निथळता पारा....संजय गोरडे.
*
१५३.
राखेमध्ये दडलेला अंगार असावा
सणकी दिसणारा कोणी फनकार असावा.....शिल्पा देशपांडे.
*
१५४.
वाजला संबळ मनातुन गोंधळाचा
देव मग अंगात आला परिचयाचा...गणेश नागवडे.
*
१५५.
चालला हा देश माझा कोणत्या वाटेवरी,
लागला हा डाग कैसा आज या माथ्यावरी...शरद काळे.
*
१५६.
रीत स्वागताची ही न्यारी बघुनी हासत आहे मी
खड्डे दिसती जिकडेतिकडे रस्ता शोधत आहे मी... विजयकुमार देशपांडे.
*
१५७.
मी जन्माला आल्याची तक्रार करावी कोठे?
छळणा-या आयुष्याची तक्रार करावी कोठे?....स्वाती शुक्ल.
*
१५८.
ठेवलास तू जरी स्वत:वर सक्त पहारा
दशोदिशातुन तुला बिलगला माझा वारा... ललिता बांठिया.
*
१५९.
राग लोभ असूया आकस ह्याचे करू विसर्जन
आनंद मैत्री समाधान शांती ह्याने भरू दे मन....मानसी चापेकर.
*
१६०.
नव वर्षाच्या नव क्षितिजावर तू मी मिळुनी सारे
चल नव्या क्षितिजास मागू विश्वासाचे वारे.....नीतिन देशमुख.
*
१६१.
रे आयुष्या खिसा एकदा काप माझा
किंवा अश्रुच डोळ्यांचा तू ढाप माझा....पियुष खांदेश्वर.
*
१६२.
झाल्यात गडद वाटा बेफाम त्या धुक्याने
माणुस वाटला रे जातीत माणसाने…संदीप देशमुख गणोजेकर
*
१६३.
ने मला हरवून...जाताना
एकदा परतून... जाताना...अनिल आठलेकर.
*
१६४.
नाव खुदाचे घेउन कोणी फकीर होतो का
चारदोन रचनांनी कोणी कबीर होतो का... शुभानन चिंचकर.
*
१६५.
कागदी विमाने आणि कागदीच नावा
कागदी प्रवासी जाती कागदाच्या गावा....प्रफुल्ल कुलकर्णी.
*
१६६.
वाटतो जरी प्रसन्न मी वरून
दु:ख साचलेय आत भरभरून ...डॉ.कैलास गायकवाड.
*
१६७.
नको आवाज देऊ तू अता कोमात आहे मी
जगाच्या सोड माझ्याही कुठे ध्यानात आहे मी....राधिका फराटे.
*
१६८.
मी तरी आता व्यथांचे पांघरू शेले किती
सांग आयुष्या मला तू पांगळे केले किती.....वंदना पाटील वैराळकर.
*
१६९.
तिमिरावरती मात कराया तेजाचा स्वीकार करू
तेजोमयता अंगिकारूनी विश्वाचा उद्धार करू ...डॉ.संतोष कुलकर्णी.
*
१७०.
रुढार्थाचा नव्याने जोडुनी साचा,
करी अनुवाद एखादाच काळाचा....गणेश नागवडे.
*
१७१.
चार पेग संपवले होते
नवे दु:ख फसफसले होते...स्वप्नील शेवडे.
*
१७२.
तेवेन मी नव्याने ज्योतीस वात दे तू
थोडा उजेड वाटू हातात हात दे तू ....रत्नाकर जोशी.
*
१७३.
तू फुलांचा घोस माझा तू सुगंधी श्वास माझा
मी गळा द्यावा खुशीने तू असा गळफास माझा....रावसाहेब कुवर.
*
१७४.
झाली उध्दट नम्रता विसरले औदार्य आता दया;
प्रीतीनेच प्रतारणा प्रसविली सत्यास नाही रया.....खलील मोमीन.
*
१७५.
या दु:खाला जरा भरजरी करून बघ ना
आणि सुखाची कधी मस्करी करून बघ ना.... @Rupesh देशमुख
*
१७६.
नाव त्याचे टाकले असते कदाचित...
मी स्वतःला भेटले असते कदाचित....सुप्रिया मिलिंद जाधव.
*
१७७.
तहानेल्या किती रांगा,मला सांगा;
कुणी ही चोरली गंगा, मला सांगा....#डॉ.श्रीकृष्ण राऊत
*
१७८.
गालावरी तुझ्या या खळी पडू नये
निष्पाप चार पक्षी बळी पडू नये.....पियुष खांदेश्वर.
*
१७९.
येथल्या मातीत जर आहे शिवाजी
येथला प्रत्येक बंदा तर शिवाजी....नितीन देशमुख.
*
१८०.
जीव देणारे जिवाला विरळ झाले का ?
वाटते जगणेच आता ठिगळ झाले का ?...विनिता/मृणाल घाटे.
*
१८१.
का रित्या अोंजळी आजही पावसा
नोंदवावी कुठे मागणी पावसा....गौतम राऊत
*
१८२.
साऱ्या नद्यांचा किती वाढला ताप
प्रत्येक येतो धुण्याला आपले पाप ... प्रकाश मोरे.
*
१८३.
परस्परांना घेवू कवळुन या वळणावर
जुने पुराने देवू झटकुन या वळणावर….बाळ पाटील.
*
१८४.
रस्त्यावरती केवळ ठेचाळत होतो
अन मी नसलेले घर धुंडाळत होतो.... सिद्धार्थ भगत.
*
१८५.
तोच मी अन् नाव माझे तेच आहे
ओळखू येईन का ? हा पेच आहे....शिव डोईजोडे.
*
१८६.
हे खुले घरदार मन रिते अजुनी
दे तुझा आधार मन रिते अजुनी...प्रवीण हटकर.
*
१८७.
निष्पर्ण या जिण्याला ‘जगणे’ कसे म्हणावे
बुडुनी तळास जाण्या ‘तरणे’ कसे म्हणावे...डॉ.राम पंडित.
*
१८८.
वेडा कुणी म्हणाला गर्दीत माणसांच्या
का वाढतो दुरावा सलगीत माणसांच्या....रुपेन कदम.
*
१८९..
या जगाची सभ्यता जाणून आहे
मी लफंगा जन्मल्यापासून आहे....गजानन वाघमारे.
*
१९०.
हे जगणे श्वासांची किंमत मागत आहे
श्वास अता घ्यावा की नाही वाटत आहे....प्रशांत रणसुरे.
*
१९१.
हे देवा मी तुला मानतो जाणत नाही
माणूस नसतो देव कधी हे मानत नाही.....नितीन देशमुख.
*
१९२.
हिरवा ओला श्रावण जळतो कळते कोठे
तोल आपुला केव्हा ढळतो कळते कोठे....सुधीर इनामदार.
*
१९३.
ठेवू नको भरोसा शब्दावर माणसाच्या
वावरतो रुपात सैतान माणसाच्या ....आशा पाटील.
*
१९३.
लागेल कशी नाव तिरावर..
पाणी चढले जर डोक्यावर....मनोज सोनोने
*
१९४.
रडू आखरीच्या क्षणाला नको
दिलासा मढ्याच्या मनाला नको.... सुनिलनाना पानसरे.
*
१९५.
कोणी न साव येथे तू ही दडू नको
चोरात मोर हो रे... पण ओरडू नको...सतीश दराडे.
*
१९६.
कोरड्या नर्मदीय गोट्यांचे
माजले स्तोम थोर खोट्यांचे...शुभानन चिंचकर.
*
१९७.
चेहराही छान आहे आरसाही छान आहे
आतला विद्वेष सोडुन सर्व काही छान आहे.....अनंत नांदुरकर खलीश.
*
१९८.
हे पान हलेनासे का झाले आहे
हे गूढ कळेनासे का झाले आहे...समीर चव्हाण
*
१९९.
हे वैभवात जगणे मजला पसंत नाही
कामात राहते मी कुठलीच खंत नाही....डॉ.शरयू शहा,मुंबई.
*
२००.
ही फक्त घराण्यासाठी नावाला चळवळ आहे
रक्तात कुणाच्या कोठे उरलेली सळसळ आहे..... प्रकाश मोरे
*

(संकल्पना आणि संग्राहक : @देवदत्त संगेप / Devdatta Sangep)
*

Post a Comment

0 Comments