Best attitude marathi shayari |


मनाच्या खोल डोहाचा उपसला गाळ मी जेव्हा..
बदामी दोन डोळ्यांचे झरे झाले झरे झाले..

©निंतीन देशमुख.


संशयाची वाढली दलदल अता
चालला आहे कशाचा खल अता?....

निशिकांत देशपांडे


ओघळत नाहीत गालावर तिचे अश्रू
पापण्यांखाली तिच्या दलदल असू शकते….

©निलेश कवडे


खोल चिखलात हसरे कमळ ठेवले
हात मळले तरी..मन उजळ ठेवले....

©प्रफुल्ल भुजाडे


सर्व इच्छांचा उराशी गाळ सोबत ठेवला ...
मी तुझ्या माझ्यातला दुष्काळ सोबत ठेवला...

© प्रशांत रणसुरे


हयातीत माझ्या चिखल फेकले तू
चितेवर कशाला अता फूल माळा..

©रामकृष्ण रोगे


चेहराही छान हाती टाळ आहे
काळजात केवढ़ा हा गाळ आहे...

©रविंद्र जवादे


आठवांची खोल दलदल वाढते
आत माझ्या एक जंगल वाढते…

©रुपेश देशमुख.


विकासाला म्हणे करता..तुम्ही गर्भार मोदीजी?
स्वतःचा नीट केला का, कधी संसार मोदीजी ?
.
फसे चिखलात ही जनता..कमळ हातात येईना?
मनाचा गाळ उपसा ना, तुम्ही सरकार मोदीजी ...

©रवी चापके


चिखल होईल नुसताच श्वासामधे...
ओठ ओठात जर कालवत राहिले...

©राधिका फराटे


माखून घेतले मी चिखलात हात माझे
मग शेवटी कुठे ही मूर्ती तयार झाली...

©डॉ.राज रणधीर


चिखलात खोल फसले सगळेच पाय आता;
मातीस सापडेना काही उपाय आता...

©श्रीकृष्ण राऊत


अर्धा उभार फसला आहे नदीत जो तो;
काठावरील म्हणती पाण्यात गाळ नाही़....

©श्रीकृष्ण राऊत


परस्परांचा वापर केला पण बोभाटा नको वाटतो ;
फुलल्यावरती कमळालाही भवती गाटा नको वाटतो…

डॉ.श्रीकृष्ण राऊत
(गाटा = चिखल)


परस्परांचा वापर केला पण बोभाटा नको वाटतो
फुलल्यावरती कमळालाही भवती गाटा नको वाटतो….

©श्रीकृष्ण राऊत


निसरडी वाट आहे भोवताली गाळ पोरी
तुझे तारुण्य आहे आंधळे... सांभाळ पोरी...

©संतोष वाटपाडे


कमळ उगवेना अगर मूर्ती घडेना कोठली
माजला डोक्यामधे नुसता विचारांचा चिखल...

©शुभानन चिंचकर


शेतात पाय मळती जेव्हा चिखल सुखाने
नाचे मयूर होउन मग अंबरात पाउस ...

©सीमा गादे


कमळ व्हायला कारण झाला
परिस्थितीचा चिखल यारहो….

©सतीश दराडे


ऊब स्पर्शामधे कमी होती
की त्वचा फार संयमी होती
.
एकमेकांवरी चिखल उडला
गावठी रंगपंचमी होती...

©सतीश दराडे


रात्र गोठून गाळ झाल्यावर
चंद्र हसला सकाळ झाल्यावर...

©सतीश दराडे


वाढला आहे चिखल माझ्यामधे
शक्य असले तर उमल माझ्यामधे..

©स्वप्निल शेवडे


नात्यात ओलावा असावा मोजका
होतो चिखल हमखास त्याचा एरवी...

©सदानंद बेंद्रे


सोड दलदल या क्षणी तू जीव वाचव आपला
मी गुराखी की कसाई ते बघू पुढले पुढे…

©सदानंद बेंद्रे


मग भले झालो तरी चालेल दलदल
फ़क्त एका मृगजळाने "हो" म्हणावे….

©सुधीर मुळीक


ना कुणाचा राहिला अंमल इथे !
देश बुडव्यांचीच ही दलदल इथे !..

©संतोष शेळके


मज वावडे जराही नाही गडे धुळीचे;
येथे कमळ उगवते चिखलात ऐकतो मी....

©श्रीराम गिरी


चिखल उडवतो का दुसऱ्यावर दलदलीत तू फिरताना
हात स्वतःचे स्वच्छ असू दे अंगरख्याला पुसताना…

© डॉ.स्नेहल कुलकर्णी


नकोच सांगू काटा रुतला ,कोणी काही ऐकत नाही
चिखल मनाचा पसरवताना, चाफा सडतो हिरव्यारानी...

©स्मिता गांधी


हात चिखलात बरबटुन गेले
कमळ गेलो धरायला आपण...

©वैभव देशमुख


गढूळ झाली नजर एवढी गाळ पाहुनी इथला
जरी निरागस पण कमळाचा संशय येतो आहे...

©विशाल राजगुरु


संगत मी कमळाशी केली चिखलामधल्या
दलदल भवती पण फसण्याची चिंता नाही…

©विनोद मोरांडे


सुटले न संत सज्जन माझी तुझी कथा का
उडले इथे चिखल त्या ज्ञानबा तुक्यावर...

©विनोद मोरांडे


चेहरा का उदास दाखवते?
दुःख आहे उगाच भासवते
.
आठवांची दलदल झाली बघ
आसवे का मनात साठवते ...

©डॉ.विश्वास भोळे


वाढते शेवाळही पाण्यात असताना
तैरते चिखलात म्हणजे कमळ झाले का ?...

©विनिता/मृणाल घाटे


उभे चिखलात ते राहून ही बघतात इतरांना
किती आहे कुणाच्या लागलेली घाण पायांना....

©वैश मिर्झापुरे

कोण आहे केवढे चिखलात पाहू
अंग थोडे आपले पाण्यात झटका...

© विजया गायकवाड

संकलन- देवदत्त सांगेप

Post a Comment

0 Comments