121+ kiss marathi shayari | love marathi shayari | marathi shayari on lips |


[ 121+ kiss day marathi shayari  ]
| Marathi shayari |

ओठ ओठांवर तुझ्या ठेऊन पाहू का ?
मी नशेमध्ये जरा झिंगून पाहू का ?


©महेश जाधव

गोड कुप्पी एक ह्या ओठात ठेवा;

लोभ थोडासा इथे रागात ठेवा.
©श्रीराम गिरी 
ओठावरचा तीळ सांगतो

उपवासाला तीळ चालतो.


©स्वाती शुक्ल ओठ येता पुढे पाकळी ठेवली

कोवळी वासना कोवळी ठेवली


©सतीश दराडे


शेवटी उरलीच ना रुखरुख ओठांवर

मी तुला सांगायचो संयम नको ठेवू.


©सतीश दराडे 


संयमावर रांगडा पर्याय शोधाया शिका

गाल नाही बोलले तर ओठ चुंबाया शिका


© सतीश दराडे निरोप घेणे दोघांनाही अवघड झाले

ओठावरती ओठ टेकले जाता जाता


©शिव डोईजोडे मी लिहू कितीदा कविता चुकलेल्या ठोक्यांवरती ?

एखादी ओळ लिहू दे ओठांना ओठांवरती


©सुधीर मुळीककशी मानू मुकम्मल ती गझल माझी

तुझ्या जर दोन ओठांचा ठसा नाही 


© सुधीर सुरेश मुळीकहवे होते तिचे मज श्वास पण मी घेतले नाही

अपेक्षा काल ओठांच्या जराशा वाढल्या होत्या.


©संतोष वाटपाडे ओठ काय लागला फ़ुलातल्या दवाला

भृंग पाकळीत जेरबंद होत गेला


©संतोष वाटपाडेतीळ ओठांचा तुझ्या मी चुंबतो अन्

छान होते साजरी संक्रात माझी.


©संतोष शेळके नजर होताच शाई ओठ माझे लेखणी झाले

नको गिरवूस ओठांवर तुझ्या माझ्यातल्या गोष्टी


©शशिकांत कोळी(शशी)हनुवटीला ओठ माझे लागले असते

तोच ओठांचा किनारा लाभला आहे


©शशिकांत कोळी हृदयातुनी कधीही जमले न काढणे पण

काढून नाव टाकू ओठावरून आता.


©सुशांत खुरसाले बंद केलेत कान मी माझे

ओठ केलेत दान मी माझे


©स्वप्निल शेवडे फुलासारखा ओंजळीत हा मुखडा यावा

या ओठांना वाटे घ्यावे खुडून शप्पथ


©श्रीपाद जोशीभेटीत राहिल्या काही अस्पष्ट खुणा ओठांवर

ते स्मरते खिडकीपाशी जे ओठ बोलले होते


©श्रीपाद जोशी. ओठ तू ओठांवरी या ठेवले माझ्या असे

बघ जरा तू काळजावर उमटले त्यांचे ठसे


© शरद बाबाराव काळे न बोलता जाणून घे तुही माझ्या मनातले

ओठांवर ओठ ठेवता शब्द कळले मौनातले


©स्वप्ना राजेश पिंपळे ओठ ओठां बिलगले जेव्हा सखे

रात्र तगमग जागणे माझे तुझे


©तुषार जोशी तुष्की ओठांवर तिळ कसला हृदयावर वार जणू

या रूपखजिन्याचा तो राखणदार जणू..


©तुषार जोशी तुष्की लपवून दुःख कोणते हसतात ओठ वेडे

किती नाटकी हे हावभाव होत आहे


© उज्ज्वला सुधीर मोरे आनंदाने गात राहिलो जे जे ओठांवर आले

सुखदुःखांच्या पल्याड जाता हाताशी अंबर आले.


© वैभव जोशी ओठात ओठ त्याने गुंतले असे की

धुंदीत ओढणी थोडी छळून गेली..


©विजया गायकवाड,नांदेड. अभंगातले चिन्मय होइन तू म्हणशिल तर

शृंगारातील संयम होइन तू म्हणशिल तर


ओठांवरती तुझ्या ठेवुनी थेंब मृगाचा

तुला पिणारा चातक होइन तू म्हणशिल तर


©वीणा डोंगरवार पिपासा तुला जागली प्राशण्याची

सख्या, ओठ ओठांवरी टेकवू का ?


©वीणा डोंगरवार केवढे सुंदर, सहज ती राहिली बोलत

ओठ म्हणजे दोन ओळी भासल्या 'मिर'च्या


©वैभव देशमुख दार मनाचे दिसता उघडे लगेच घुसली मनात ती

दात आपले ओठ आपले आठवणीची घुसखोरी 


© विजयकुमार देशपांडेओठ माधुर्यात दोन्ही नाहलेले

अन म्हणे तू साखरेची काळजी घे 


© विश्वास कुलकर्णीचुंबून ओठ आधीच झाले गुलाबी,

लाली उगाच लावून जातो हिवाळा


© विजय चांदेकर फुलांचे डाग ओठांवर चुकुन दिसलेच तर?

पुरावे संपवू म्हटले तरी उरलेच तर?


© प्रशांत पोरे कबूली कारखान्याची कधी असणार की नाही?

तुझ्या ओठांतली साखर मला मिळणार की नाही?


©प्रशांत पोरे तुपाचे बोट लावुन का कुणाचे ओठ सावरले

तुझ्या तांबूस ओठांचा जरासा संग लाभू दे
©प्रशांत पोरे ओठी तुझ्या न आले अद्याप नाव माझे

अन् ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही.


सुरेश_भटओठांचा होकार मिळाला

प्रेमाला आधार मिळाला


©अनिल आठलेकरफक्त स्पर्शाने किती गंधाळलेली वाटते,

रात्र ओठांच्या तुझ्या जवळून गेली वाटते.


©‎अनिल विद्याधर आठलेकर 'सफ़ीर'‎ तुला संधी मिळाली ओठ पुन्हा गोड करण्याची,

तुझा तिळगूळ देण्याचा बहाणा चांगला होता.


©अमोल शिरसाट दु:ख विसरून गायचे होते

आज मजला हसायचे होते


नाव ओठांवरी तुझे आले

प्राण जेव्हा निघायचे होते


©डॉ.अनंत ढवळेआसवांच्या दावणीला दु:ख ही बांधू नये

अन पुन्हा ओठांतुनी मी शब्द ही सांडू नये


©अनंत नांदुरकर ‘ख़लिश’श्वास ओठी बासुरीचे सूर झाले

लाजणे राधे तुझे मशहूर झाले


©अनंत नांदुरकर ‘ख़लिश’ती डोळ्यांनीच म्हणत राहीली हो हो

मी ओठांवरचे वाचत बसलो नकार


©अझिझखान पठाण 


शब्दांची गोडगुलाबी साखर ओठावर असते

अन् पायाशी घुटमळते स्वार्थाचे काळे मांजर


© अल्पना देशमुख-नायक 


तुझा महिमा,तुझी ख्याती,तुझे कौतूक ओठावर

तुला समजून घेताना तुझा आकार झालो मी


©आत्माराम जाधव .वारुणी तू अन तुझे हे ओठ प्याले

त्यागणे यांना मुळी हे पाप आहे


©अजय पांडे 'बेवक़्त' तीळ माझ्या की तुझ्या ओठांस आहे

हे ठराया आणखी जवळून पाहू..


©आनंद पेंढारकर रात्र संपली तुझ्या मिठीची मंतरलेली

तरी अजुनही ओठी शिल्लक साखर आहे


© अमृता साळुंके जोशी कशाला सारखी द्यावी तुला मी लाच ओठांची

व्यथा मौनात दडलेली कधी तू वाच ओठांची


जसे मी ऐकले आर्जव तुझ्या भावूक ओठांचे

तशी मी ऐकली आहे जरबही त्याच ओठांची


©डाॅ अमिता गोसावी दुःख सारे माळले मी

धर्म सारे पाळले मी


मौन होते ओठ माझे

अश्रु नाही ढाळले मी


©अलका देशमुख ओठात एक असते, पोटात एक असते

सारेच लोकनेते, अवतार खंजीराचे


©आबेद शेख झोपेत एकदा ओठ चुंबिले

पुन्हा कधी पाघळलो नाही


©अशोक थोरात. मैफिल संपलेली, अस्तास सूर्य आला

नि:शब्द ओठ असता, आता गझल कशाला?


©अशोक कुलकर्णीएकदा ठेऊन तर बघ ओठ ओठांवर,

मग कशी होईल बडबड बंद ओठाची


©अरुतनया ओठी उद्या जगाच्या येईल नाम माझे

मी बोलणार नाही बोलेल काम माझे


©अनिता बोडके ओठावरती जरी अबोला डोळ्यामध्ये आग किती

नाही नाही म्हणता त्याला येतो माझा राग किती


©अनिता बोडके 


ओठ चुंबताना हा...प्रश्न भेडसावे की

चुंबण्यास एखादे...का कपाळही नाही


© बेफिकीरपाहुनी मी कमाल ओठांना एक केला सवाल ओठांना

केवढा पक्षपात ओठांचा भावले फक्त गाल ओठांना?


©बंडू सुमन अंधेरेतिच्या ओठावरी तो तीळ जेव्हा पाहतो मी

मला मग वाटते की आजही संक्रांत आहे .


©भैय्या पेठकरचेहरा बघ रोज ती न्याहाळते अन्. 

ओठ दातांनीच मळते तात्पुरते.


© बदीऊज्जमा बिराजदारकधीही भेटलो नाही तरीही रंगली चर्चा

तिच्या ओठांवरी हासू मलाही भावली चर्चा


© बबन धुमाळ
तेव्हा वसंतास तू नाकारले

झाला अता रंग ओठांचा फिका


©चंद्रशेखर बादशाह एके दिवशी ओठ पूर्ण मौनातच गेले

इतके सारे सवाल माझ्या मनात होते


© चंद्रशेखर सानेकर
ओठांचा पोहरा सुकू दे!

हृदयाच्या आडात बघू चल,


©दत्तप्रसाद जोग वादळ उठते आजकाल मी तोंड उघडता

ओठ दाबुनी गप्प बसावे, असे वाटते


© दिलीप_पांढरपट्टे
घट्ट बाहुपाश होते ओठ ओठी गुंफ़ले

वासनांचे रंग थोडे वाळवावे लागले


©दीपा मिट्टीमनी गोंदली नक्षी जणू तू गौर या देहावरी नी

रंग ओठी घेवुनी चित्रात भरले छान आहे


©धनश्री किशोर पाटीलका अडावे नाव माझे नेमके ओठात तेव्हा

घेतले ओठात जेव्हा तू उखाणे पावसाचे..


©दास पाटील.


ओठ साधे उघडण्याचे काम केले

अन् जिभेने बोलणे बेफाम केले


© दास पाटील.नको घेऊस माझ्या आळ ओठांवर

तुझा शाबूत आहे तीळ ओठांवर


©धनंजय तांदळेओठात एक त्याच्या पोटात एक आहे,

ते बांडगूळ अंती उलथून घे पुन्हा तू!


©गणेश नागवडेगुळाला तीळ लावावा तसे द्यावे तिने चुंबन

मला संक्रांत भेटावी अशा हळुवार ओठांनी.


©गणेश नागवडे शक्यता आहे जराशी वाचण्याची या जीवाला; 

जर तुझे ते ओठही गुलकंद होऊन गेल्यानंतर.


©गणेश नागवडे सवय तूच लावलीस भलती ओठांना माझ्या

गोड कसे व्हायचे तोंड हे फक्त तिळगुळांनी ?..


©गोविंद नाईक.रंग सरल्या बर्फगोळ्या सारखे आयुष्य होते

स्पर्श ओठांचा तिच्या लाली नवी देऊन गेला


©गोविंद नाईक.बघ.. पुन्हा करतील चुळबुळ ओठ माझे..

ठेव ओठांचा तुझ्या जागा पहारा..


© गोविंद नाईकओठावरी जरासी हलकेच शीळ येता

मैना घरातली मग खुलते बऱ्याचवेळा 


© गणेश शिंदे दुसरबिडकररुसलेले ओठ तुझे,ओठांनी उघडू का?

त्या कुलुपाला दुसरी,चावी लागत नाही


©गोपाल मापारी हलकेच टेकले ओठावर मग ओठ तिने जास्वंदी

कोरली मनावर हळव्या व्याकुळ आठवणींची मेंदी 


©गिरीश देशपांडे होकार तिच्या डोळ्यांचा, ओठांचा नकार आहे

जमणार कधीही नाही, तो यत्न चालला आहे


©हेमंत राजाराम बासरी होवून मी ही रे तुझ्या ओठीच यावे

मोरपंखी स्पर्श व्हावा, अंग माझे मोहरावे


©हेमलता पाटील छळाया लागले हे श्वास ओठांना

गरम स्पर्शात थरथरती अधर बाई


©हेमलता पाटील जरा ओठा जवळ घे ओठ अन दाखव धिटाई

मलाही पाहुदे असते कशी अस्सल मिठाई


© हर्षल सुरेखा-सुभाष पवारवेगळे काहीतरी येईल ओठांवर ,

मी कसे प्रत्येकवेळी तेच ते बोलू ?


© जयेश पवारतिळाची स्निग्धता स्पर्शी ,गुळाचा गोडवा ओठी

तुझ्या भेटीमुळे संक्रात रोजच साजरी होते


©जयश्री कुलकर्णी या जखमांचे दूषण मी कोणाला देऊ ?

ओठ चावले ज्याने तोही दात स्वत:चा


©जनार्दन केशव गोडवा निर्माण होण्या लागले काही न दुसरे

एकतर ओठात साखर, अन् मिठी उबदार आहे


©जनार्दन केशव म्हात्रे अचानक तुझे नाव ओठात येते

पुढे रात्र सारी दबावात निघते


© जयदिप विघ्नेओठ ठेवू नको पापणीवर सखे 

मी कशाला तुझे ओठ खारे करू 


©जयदिप विघ्ने बंद ओठांवर तुझा तो भास वेड्या;

मारतो फुंकर हळू त्या सांत्वनाला


©सौ.ज्योती.प.शिंदे ‎ ओठ माझे बंद आता

बोलणे भरपूर आहे


©सौ ज्योत्स्ना राजपूत सोडून हात गेले आयुष्य दूर तेव्हा

ओठांत मूक हाका, डोळ्यांत पूर होता


© क्रांति साडेकरका उत्तरे मुकी ते प्रश्नांस आकळेना;

की शब्द कैद झाले ओठांत उत्तरांच्या ?


© क्रांति साडेकर कोवळे ओठ तुझे आज रुतावे ओठी

दे नवा डंख असा धुंद, भिनायासाठी


©कालिदास चवडेकर आता भास हि वाटतो तुझा खरा मला..

बंद ओठांच्या कळ्या तू उमलून टाक ना


© किरण_विकास_कांबळेओठ रंगवुन खिडकी बसली

रस्ता जेव्हा दलाल झाला


©कविता क्षीरसागर तू गालावरचा तिळ

तू ओठावरची शिळ..


© कविता ननवरेओठांना ओठांचा स्पर्श जाहल्यानंतर

त्याच्या ओठांत ओठ माझे गुंतत गेले


©कांचन कानतोडे गारव्याला घाम फुटला...चांदराती

तू मिसळता ओठ हे ओठात माझ्या 


©डॉ. लक्ष्मण उगलेओठांवरील चिन्हे साजण पुसून गेली

ठेऊ नये म्हणाली भेटीतले पुरावे


© लतीफ शेखगुन्हा नव्हताच ओठांचा , उगा बदनाम झाले ते

तुझ्या डोळ्यांत होते त्या गुन्ह्याचे मूळ दडलेले


©मानसी चापेकर ओठांनी ओठांवरती गिरवावे ऐसे अक्षर

डोळ्यांनी दोघांमधले मिटवावे सारे अंतर


© मानसी चापेकर‎ आपलेच दात अन आपलेच ओठ होते

कोणास दोष द्यावा सारे आपलेच होते


©मनिषा सिलम काल तू जिथे हळुच ओठ टेकले

अर्धचंद्र लाल मी जपून ठेवले


©मनीषा अतुल जळतात ओठ माझे नाजूक पाकळ्यांनी

येतो इथे शहारा आरक्त पाकळ्यांनी


हळुवार चुंबीले तू हर एक अंग माझे

झाले सुगंध गाणे गांधर्व पाकळ्यांनी


©मनीषा अतुल काल अचानक नाव तुझे ओठांवर आले

मग गालावर उमटत गेले केशर सजणा


©मनिषा नाईक फुलाचे नाव तू ओठांस द्यावे;

खुडावी पाकळीने पाकळी मी!


©ममता सिंधुताई
जरा गाल दे..ओठ दे ना जरा

खुळ्या मागण्या या..खुल्यावर नको


©ममताप्रत्येक भेटीचे सख्या,होईल का गाणे कधी?

हासून ओठी लाजरे,देशील का गाणे कधी?


©माधुरी चव्हाण जोशी जरा जरा तुझी मला कळते गझल

ओठावर माझ्या अशी रूळते गझल


©मधुराणी बनसोड संपल्या प्रेमातल्या खाणाखुणा

का तरी ओठी ठसा सांभाळला


©मारोती मानेमोड गुमान ओठ जाहले कळेल का तुला कधी

तुझ्याविना जगात या हसायचेच राहिले


©निर्मला सोनीऩभाचा स्पर्श झाल्याने, धराही बावरी झाली

नभाला ओठ फुटले मग ,धरेची बासरी झाली.


©नितीन देशमुखतुझे ओठ जेव्हा वळू लागले

मला डाव सारे कळू लागले.


©नितीन देशमुख तुझ्या अद्याप ओठांवर ठसा कायम दिसत आहे

तुझ्या डोळ्यांमधे माझा जुना अल्बम दिसत आहे


© निलेश कवडेओठात एक दुसरा पोटात अर्थ होता

असल्या दुहीमुळे तो बेजार होत गेला


©नंदकिशोर आगळे बोलणे शब्दाविनाही लांबले..

ओठ ओठांवर पुन्हा रेंगाळले


©निर्मिती कोलते लाल ओठांच्या किना-यावर तुझ्या बांधेन मी घर

भेट मग लाटेपरी मज थेट अन… हासून घे तू. .


©पूजा भडांगे लगदिवे ओठांत हो तरीही म्हणतो नकार आहे

एकंदरीत सगळा भलता प्रकार आहे


© पूजा भडांगे लगदिवेओठांना जर डोळे असले असते

नजर खरी नजरेला भिडली असती


ओठांच्या ओंजळीत आले अश्रू

ओठांनी तर खळी वेचली असती


©प्रथमेश तुगांवकर 
तिचे ओठ हलले, तिचे नेत्र वदले

जराही तरी कळवळेना मुखोटा


©प्रमोद खराडे
तुझ्या उबदार श्वासांचे फुलावे सूर देहातुन

मिळाया स्पर्श ओठांचे तुझी मी बासरी व्हावे


©प्रकाश मोरेसमजायचे ते समजून घेतले

मी ओठ मूके वाचून घेतले


©प्रकाश मोरे. 


सहज ओठ मी ठेवुन आलो घराकड़े अन

तिच्या गुलाबी ओठांची ती मिजास करते.


©वराडे पुरुषोत्तमकाय मी इतका असावा देखणा की

एक जोगिण ओठ ही चावत निघाली


© पुरुषोत्तम वराडे.ओठ मी ते दाबताना व्रण जरासे जास्त झाले

अन्‌ फ़ुलांच्या मुग्ध ओठी सावळेसे गीत आले


©प्रभा प्रभुदेसाईपाकळ्यांसमान ओठ मुडपणे गझल

पापण्यांत सागरास हसवणे गझल


©रणजीत पराडकर बोलू नकोस आता काही

ओठावरती ओठ दिल्यावर


©रमेश ठोंबरेतिळावर गुळ ओठांनी जरासा ठेव प्रेमाने

अशी संक्रांत ही माझी सख्या दरसाल होऊ दे..


©राधिका फराटे. ओठ ओठावरी .. हात हातामधे

रात्र ही गोठते पाहताना शपथ

©राधिका फराटे 
श्वासांत गुंतले अन् झाले तुझ्या हवाली

ओठांस ओठ आता येतात आड माझे

©राधिका फराटे 
चिखल होईल नुसताच श्वासामधे

ओठ ओठात जर कालवत राहिले..


©राधिका फराटे
तुझ्या प्रत्येक शब्दांचा.. निराळा गोडवा आहे

बघू दे आत ओठांच्या खडीसाखर कुठे आहे ?
©राधिका फराटे 
जोडवी पायात ... कुंकू शोभते भाळावरी

लाजतो ओठी उखाणा केवढे आहे बरे© Radhika Prem Sanskar
किती घेतले इथे ऋतूंनी तुझे उखाणे..

तुझ्याच ओठी आले नाही नाव फुलांचे©रुपेश देशमुख 
झालीच असती दिलजमाई ह्याही वेळी, पण...

वाद घालण्यापुरता केला ओठांचा वापर© सुप्रिया मिलिंद जाधव
फक्त सोपस्कार जर वाटेल ओठांचा

चुंबणे असले निरर्थक काय कामाचा


©श्रद्धा खानविलकर 
Post a Comment

0 Comments