50+best hug marathi shayari collection| Love marathi shayari |


[ best hug marathi shayari collection ]
ही तुझी वाटचाल कायमची..!

एक हाती मशाल कायमची..!तू कधी ओठ स्पर्श करते का?

मागते फक्त गाल कायमची…

संदीप पाटील.अचानक स्पर्श झाल्यावर किती ती बावरी होते
नजर मिळताच नजरेला दिवाळी साजरी होते...

शशिकांत कोळी(शशी)छळे गार वारा ,तुलाही, मलाही
इशारा ॠतूंचा ,तुलाही, मलाहीफुलांना शहारा नव्यानेच आला

सले तोच काटा ,तुलाही, मलाही....

स्वाती शुक्ल.निसटता तुझा स्पर्श झाला जरासा
बहर काय असतो क्षणातच कळाले...

स्वाती शुक्ल.बाप असताना मिठी मारून घ्या रे
आठवण आभास देते, स्पर्श नाही...

सदानंद बेंद्रेकोरी वही, पान दुमडले असे, पत्र निनावी तिथे
वाळल्या पाकळ्या हुंगताना मनी, खोल शहारा उठे

सूरज उतेकर.ताजेच आहेत अजूनही
मनावर उमटलेले शहारे
ती सांज, ती प्रतिक्षा
आणि क्षणात बदललेले सारे...

शशी.हा सागरी किनारा
स्वच्छंद धुंद वारा
श्वासास वेड लावी
स्पर्शातला शहारा...

संगीता पाटील.
बेसूर गातो वारा राणी तुझ्याविना हा
नाही अंगी शहारा राणी तुझ्याविना हा

जीवनगाणे सुखात गातो जरी मी येथे
वाटे मज तो पसारा राणी तुझ्याविना हा

सुरेशकुमार शेन्डे

सर् सरुन अंगावरी उठतो शहारा
ह्या मिठीचा वाटतोही आसरा रे!माळ गजरा, केवडा, जे जे हवे तू

ये करू शृंगार तोही साजरा रे! ...

शरद देवराय.हलकेच स्पर्श होता अंगावरी शहारा..
भलते छळायचे ते अंगांग जाणिवांचे..

संजय गोरडे.तुझ्या डोळ्यांनी केला इशारा असावा
अंगभर उमटला तो शहारा असावा...

स्वप्ना राजेश पिंपळे.रूप असे की कणा कणातुन गोड शहारा
अलगद गालांवर फिरणारा मोरपिसारा...

तुषार ‘तुष्की’त्यागून तुझा विद्ध उसासा बघ आता
आणेल नवा श्वास शहारा बघ आता....

वैभव वसंतराव कुलकर्णी

स्पर्श माझा तुला प्रश्न होता जणू

अन शहारा तुझा उत्तरासारखा ...

विजय उतेकर.कळतो पाउस कळतो वारा
अंगावर उठताच शहारा
पाहिजे तिथे भेटू आपण
एकदाच कर फक्त इशारा...

विशाल ब्रह्मानंद राजगुरुसांग तिला तू झोंबतोय जो तिजला वारा
वारा नाही तो तर आहे तुझा शहारा...

वसंत शिंदे.आभाळाची प्रीत घेउनी
मेघ बरसती अमृतधारा
स्पर्शाने त्या भूमातेच्या
कणाकणावर हरित शहारा..

वनिता तेंडूलकर बिवलकररात असावी पावसाळी
भन्नाट असावा वारातू असावास सोबतीला

अन अंगावर शहारा !

वर्षा चौगुले.मला जेव्हा हवा असतो शहारा गारवा स्पर्शातला
मला अपुल्या क्षणांमधली मिठी ती आठवावी लागते.

वैश मिर्झापुरे.
इथे अवेळी उगाच अंधारलेच नसते
उजेडास जर मिठीत मी घेतलेच नसते...

आनंद रघुनाथमोगरा ही तुझा, केवडा ही तुझा
रात गंधाळते सारखी सारखी
.
श्रावणाच्या सरी,लाजल्या अंतरी,
ती मिठी मारते सारखी सारखी....

एजाज शेख
[ मिठी-आलिंगन मराठी शायरी ]
मिठीची मागणी केली कधी जर गार डोळ्यांनी
मलाही मारता येते मिठी उबदार डोळ्यांनीमिठीने जीव जातो ऐकले आहे तुझ्या त्या मी

मिठी तर दूर आहे पण मलाही मार डोळ्यांनी....

आकाश कंकाळ

आई असेल किंवा पत्नी असेल ती
आहेत हे मिठीचे गुणधर्म वेगळे...

बाळ पाटील.कुठे कृष्ण राधा कुठे रास आता
तसाही फुलांना कुठे वास आता
.
विळ्याभोपळ्याने गळाभेट घ्यावी
असा राहिला का कुणी खास.आता....

बाळ पाटीलआलिंगिले नि संपुन गेले नसे गोरटे ही प्रीति
प्रीति म्हणजे जसे शिंपले आपटती देवुन मोती....बाळ पाटील

मिठी मारता तू .... पहाटे पहाटे
दिवस हाय माझा सखे गोड जातो....

बळीराम पोधाडे .


सारे काही विसरून पुन्हा मिठीत ये माझ्या

थोडी घुसमट होते पण उबदार किती आहे...

भालचंद्र भुतकरओठांवरती दरवळणारी घाबरणारी
मिठीत मग या विरघळणारी लक्ष्मणरेषा...

हेमंत जाधव.स्वप्ने सारी सजूनया आली मिठीत माझ्या
हात लावता कसली वेणी कुठला गजरा?..

हेमंत जाधव.नको पुन्हा तू मिठीत येऊ नकोस आता
मम हातांची झुरेल माळा मी गेल्यावर...

हेमंत जाधवमिठीत खुलला चंद्र तुझा
टपोर हे चांदण वेचू...

हेमंत जाधव.गळा भेट घेता गळा कापण्याची
अदा आगळी ठेवती आप्त काही...

जयश्री कुलकर्णीपाहून मोसमाची बेमान रीत आता
विसरून पार गेलो पाऊस गीत आता
.
अडवू नको किनाऱ्या तू वाट आज माझी
घेण्यास मी निघालो वादळ मिठीत आता..

मसूद पटेल


सोडवू दे जिंदगीचा कोंडमारा

भेटला शोधून ही ना मज किनारा
.
स्पर्श होता वादळाचा काय झाले
जीवघेणा हा कसा उठला शहारा..

निर्मला सोनीआलींगनी तुझ्या का भासे न जोश आता ?
वाटे मनात पडझड, नुकतीच खूप झाली...

रवींद्र ठाकूर.तुझ्या माझ्या मिठीचा जो निरागस सोहळा होतो,
जरासा बाटल्याने स्पर्श ही मग सोवळा होतो..

पूजा फाटेएवढे कारण पुरे आहे मिठीला
सांगतो आहे मिठी मारून पुन्हा..

पीयूष खान्देस्वरमिठी ती न माझी सुटावी सुटावी
मजा मातृत्वाची लुटावी लुटावी
.
तुझी प्रीत आई असे घट्ट ऐसी
कधी ती न आता तुटावी तुटावी....

रविंद्र कांबळेलपेटून घ्यावे तुला भोवताली .. धुके यौवनाचे पुन्हा दाट झाले ...!
पुन्हा दोन ओळी गुलाबी निघाल्या ... पुन्हा शेर भलतेच सैराट झाले...

राधिका फराटे.खुल्या सडकेवरी मी ही मिठ्या मारायला शिकलो
तसा ओढा,तशी झाडी,तशी पांदण कुठे शोधू....

सतीश दराडे.

माझ्या तुझ्या मिठीचा इतिहास काय सांगू
संकोच आड आला एकांत लाभल्यावर....

सतीश दराडे.धावते घेउन मिठीचा गंध अपुल्या
या हवेचे पाय दोन्ही बांधुया चल...

सतीश दराडे.खरा बेत होता मिठी मारण्याचा

तशी ती म्हणाली "चलाना निघूया"…

सुधीर मुळीक


गंध हा आहे तुझा जो बिलगला आहे मलाही

वाटते खोटे तुला तर चल मिठी मारून पाहू...

स्वाती.एका मिठीत घडला भलता प्रकार आहे
माझ्या मनात अजुनी विद्युतप्रभार आहे"...

शिल्पा देशपांडे.
ते प्रेमाचे आलिंगन 'चाळा' झाले,
अन् भेटीचे प्रकरण घोटाळा झाले
.
ती निघतांना ओझरते पाहुन गेली...
काळीज उगाचच भित्री शाळा झाले...

संजय गोरडे.

मला मुक्ती कशी मिळणार देवा

मिठीचा मोह आवरता न आला...

संजय गोरडे.पौर्णिमेचा चंद्रमा तो, झाकतो खिडकीत जेव्हा..
रेशमाच्या तुज मिठीचा, धुंद मोहरतो शहारा...

संतोष शेळकेगंधाळल्या पहाटे आपसूक जाग आली
सुटली मिठी जराशी स्वप्नाची लाज आली
.
श्वासात तुझ्या नी माझ्या लय एक बांधलेली
विळख्यात तुझ्या बाहुंच्या मी खेचलेली
.
तुझी आतूर नजर मजवर रोखलेली
तुझ्या मिठीत मी पुन्हा विर्घळलेली..

शुभदा कुलकर्णी ताकभाते.


| Marathi shayari
नशा तुझ्या मिठीतली हवी हवीच वाटते
तुझी जुनीच भेट ही नवी नवीच.. वाटते....

संजय सकटे

अजून आला न माझ्या हाती तुझा हात सखे
करू कशाला मिठीची मग व्यर्थ ही बात सखे...
.
उगाच करतेस तू आता लाजण्याचे नखरे
कधी न आली जरी माझ्या बाहुपाशात सखे ...

समीर येवले.

इतक्यात करू नकोस तू लाजण्याचे बहाणे
आताकुठे मिठीत तू येत आहे शहाणे ...

समीर येवले.

मंद गारवा हवेत साथ तव सखे गृहीत
दुग्धशर्करा ग योग गात गीत ये मिठीत...

विजयकुमार देशपांडे.

[ Valentine day shayari ]

Post a Comment

0 Comments