chhatrapati shivaji maharaj marathi shayari | status marathi shayari on shivaji maharaj|

[ chhatrapati shivaji maharaj marathi shayari ]
मुलाच्या बारशाला एवढे वादळ कसे सुटले 
मुलाचे नाव त्यांनी ठेवले शिवराय आहे का 

- संतोष

कुणाला पुण्य आठवते कुणाला स्वर्ग आठवतो 
कुठे देऊळ दिसल्यावर मला शिवबाच आठवतो 

- अभिजीत काळे.
प्रतिमा पूजन करण्यापेक्षा विचारातुनी रुजवू शिवबा
अशाप्रकारे शिवरायांना अभिमानाने देवू मुजरा

©सौ. हेमलता पाटील 
कशाला वाट मी पाहू कधी परतेल तो शिवबा
मला मी मागते आता पुन्हा जन्मच जिजाईचा

©ज्योत्स्ना राजपूत 
मातीसाठी कधीही अव्वल
शर्थ माझ्या जिवाची व्हावी

बघावे मी परस्त्रीस जेंव्हा
नजर माझी शिवाजी व्हावी

© लतीफ शेख


अब्रूवरी कुणाच्या का हात घालता
शिवबा जिवंत आहे डोक्यात पाहिजे

©मनोज सोनोने दुःख अमुचे दूर करण्या इश्वरा इतुकेच कर
थोर शिवबा सारखा पाठव पुन्हा बंदा इथे

©मसूद पटेल
इतिहास काल घडले आई तुझ्या दुधाने
शिवबा इथेच बनले आई तुझ्या दुधाने

© निलेश कवडे‎ 


| status marathi shayari on shivaji maharaj|


सच्चा शिवबा एकच आहे, हजार कशाला करता ?
कानटोपरे फाडून त्याची, विजार कशाला करता ? 

©नितीन देशमुख 
शत्रूसमोर तुमची झाली न हार शिवबा
झुंजार मावळ्यांचा तू कर्णधार शिवबा

जिंकून तू दिले हे हाती स्वराज्य अमुच्या
या हिंदवी भुमीचा तू शिल्पकार शिवबा

©प्रकाश मोरे


लाख लढाया लढवत होता वीर शिवाजी
मृत्यूलाही चिडवत होता वीर शिवाजी
.
प्रेरित करण्या भरकटलेल्या मरह्ट्ट्याला
इतिहासाला घडवत होता वीर शिवाजी

©प्रशांत पोरे 
वागतो दुःखातही योद्ध्याप्रमाणे
शूर शिवबा राहतो हृदयात माझ्या 

© राजीव मासरूळकर.
कोणत्या शब्दात मांडू हे कळेना
श्वास राजे ध्यास राजे काळजाचे..

Radhika Prem Sanskar
लाखात पाहिला मी शिस्तीतला शिवाजी
फेकून मौन मारी संतापला शिवाजी

©रविप्रकाश चापके 
जुल्माला कापणारी तळपती तलवार शिवबा
होता रयतेचा दाता अन् खरा आधार शिवबा

© शेख बिस्मिल्ला सोनोशी
जन्मास येत आहे शिवबा जणू नव्याने
गर्भास देत जाती संस्कार पुस्तके ही

© शशिकला बनकर‎ 
तळपली आमच्यासाठी तुझी तलवार शिवराया
जणू तू पेरला आहे मनी अंगार शिवराया
.
असे वाटे पुन्हा यावे नवा तू जन्म घेऊनी
नव्याने दूर व्हावा येथला अंधार शिवराया


©शेखर गिरी 


असतील शौर्यगाथा तुमच्या पराक्रमाच्या 
चारित्र्य मात्र तुमचे शिवबासमान नाही 

©शरद धनगर घडवायचाच असेल शिवबा पुन्हा इथे जर,
विसरु नकोस कधी जिजाई कर्तव्य तुझे

©अरुतनया आई तुझ्या मुलाला कोळून पाज शिवबा
त्याला दिसेल परक्या स्त्रीच्या रुपात आई

©आत्तम गेंदे

अंधारावर मात शिवाजी 
एक नवी सुरवात शिवाजी

असाल जेथे दिसेल माझा 
या साऱ्या विश्वात शिवाजी 

©चंदना सोमाणी आज का तू शोधतो येथे शिवाजी ?
जन्मतो तो एकदा हा दस्त आहे

©ॲड. छाया गोवारीश्वासात शिवबा,ध्यासात शिवबा
हृदयातल्या विश्वासात शिवबा

पाहून त्याची विज्ञानदृष्टी
तो आज असता, 'नासा'त शिवबा
('NASA')

©गोपाल मापारी 
अभिमानाने सांगत असते बाई आहे
युगकर्त्या त्या शिवबाची मी आई आहे

©डॉ सुनंदा_शेळके
हे गगन चुंबीती, सह्याद्रीचे कडे
स्वराज्यप्रभू शिवराय जणू ते खडे

© सूरज उतेकर 
हे सह्याद्रीचे अंगी भिनले वारे,
शिवबा कारणे उभे मावळे सारे

© सूरज उतेकर


नवनवीन माहितीसाठी खालील वेबसाईटला भेट दया

Post a Comment

0 Comments