Marathi Gazalkar - Satish Darade | Marathi Shayar | Marathi Shayari |

[ Marathi gazalkar - satish darade ]

Marathi shayari
[ मराठी गझलकार-सतीश दराडे ]

( 1 )अभागी हुंदका जेव्हा पडे बाहेर एखादा

मिळे तेव्हाच गझलेला सुदैवी शेर एखादावळीवाच्या सरी आल्या हवाही नाचरी झाली

अशा वेल्हाळ संधीवर धरूना फेर एखादा...फिराया जन्म साऱ्यांना ठराविक कोपरा देतो

तरीही हिंडुनी येतो कसा चौफेर एखादातुझ्यामाझ्यावरी त्याने पहारा ठेवला आहे

असूदे. पाहिजे असतो कथेला हेर एखादामला देऊन नजराणा किती घाईत गेली तू

मलाही द्यायचा होता तुला आहेर एखादा...--------------------------------------------------------------( 2 )काय शिंपडले मघाशी पावसाने

ढेकळांवर सूज आली पावसानेअंकुराने उघडले नुकतेच डोळे

घातली डोळ्यात माती पावसानेगावभर उंडारुनी केरात नाचे

झुळुक केली देवदासी पावसानेमी पिकांना गायला लावीन भजने

वाजवावी फक्त टाळी पावसानेढग क्षितीजाला कधीचा लोंबकळतो

घेतली की काय फाशी पावसाने-------------------------------------------------------------- ( 3 )


सोडीन प्राण तेव्हा इतकेच पथ्य पाळा

मी खेळलो जिथे त्या मातीवरीच जाळाझाकोळल्या नभाचा मेंदू नशेत आहे

अंदाज काय त्याचा सांगेल वेधशाळामागून काय मागू अजुनी तुला अनंता

दे लोचनात करुणा, दे अंतरी जिव्हाळातू धोरणी गळ्याचा, मी थेट अक्षरांचा

माझी कशास मित्रा घेतोस कार्यशाळावाकून चालण्याची झाली सबब अशी की

पाठीतला कणाही झाला जणू लव्हाळाजमती थव्याथव्याने दारात रोज गरजा

दररोज अडचणींची भरते घरात शाळा


--------------------------------------------------------------


( 4 )येउदे खणखण असा आवाज आयुष्या

जिंदगीची वीट इतकी भाज आयुष्याहासणे निर्व्याज बाळासारखे माझे

चेहरा ठेवू कसा नाराज आयुष्या?कोण ही लाजून माझी ऐकते गाणी

होत आहे घोगरा आवाज आयुष्यामी तुक्याचा टाळ होउन बैसलो आहे

घेउनी येना तुझा पखवाज आयुष्यावाटली नाही उभ्या जन्मात केव्हाही

बापजाद्यांच्या शिव्यांची लाज आयुष्यारोज मी बाहूत घेतो वर्तमानाला

मज भविष्याचा नको अंदाज आयुष्या--------------------------------------------------------------


 ( 5 )खोल गेली मुळे किती सांगा

रोप उपटून माहिती सांगाकैक वाटेमधे तलाव तिच्या

त्या नदीची मन:स्थिती सांगागुदमरे वाहती हवा जेथे

माणसे का तिथे जिती सांगाहट्ट केलाच आसवांनी तर

पोळतो गाल ही भिती सांगाजी समाधान वाटते आहे

तीच ओंजळ कशी रिती सांगा


--------------------------------------------------------------


( 6 )अगोदर ग्लास भरुनी रानवारा दे, पुन्हा बोलू

पुढे माझ्याच दर्जाचा पिणारा दे, पुन्हा बोलूअता आकाशगंगेच्या भ्रमंतीची नको भोवळ

मला एका क्षितीजाचा किनारा दे, पुन्हा बोलूअता काढू कशाने पांढऱ्या पेशीतली मरगळ

तुझ्या तांबूस ओठांचा उतारा दे, पुन्हा बोलूभ्रमाची काढता झापड दिसाया लागली पडझड

मला माझ्या मनोऱ्याचा ढिगारा दे. पुन्हा बोलूबिलोरी चेहरे पाहुन मनाची चलबिचल होते

तुझ्या निस्सीम प्रेमाचा दरारा दे, पुन्हा बोलूदिली खेळायला काया, नको आत्मा विटाळू हा

तुझ्या नि:संग स्पर्शाचा शहारा दे, पुन्हा बोलूउन्हाच्या कानी खपल्या कशाला सावल्या शोधू

तुझ्या शिरवाळ जखमांचा उबारा दे, पुन्हा बोलू


--------------------------------------------------------------


( 7 )देहधारी कौतुके खोटी चिते

तूच अस्तित्वाहुनी मोठी चितेएक जनसागर स्मशानी लोटला

लागली का त्यास ओहोटी चितेती न आली शेवटी भेटायला

एक उरली आस वांझोटी चितेचालली आहे कुठे घेउन मला

ही धुराची उंच रेघोटी चितेचंद्रतारे जाहले चेंडू अता

जाहली पृथ्वी निळी गोटी चितेया जगाची धोरणी माफी नको

तूच घे सारे गुन्हे पोटी चिते--------------------------------------------------------------


 ( 8 )


कसा असतो खुला वारा मलाही दाव आयुष्या

कधीचा बंद आहे मी, मला ठोठाव आयुष्यास्मृतींचा लागला धक्का जिथे होते तिथे आले

कुठेही नेत नाही रे मनाची धाव आयुष्याउडी मारून झाल्यावर जमेना हालणे साधे

उडी मारायच्याआधी किती तो आव आयुष्याखरे समजून वाजवले तुझे खोटेच नाणे मी

तुलाही तेवढ्यापुरता मिळाला भाव आयुष्यासदा तू ओंजळी माझ्या हवा देऊन गौरवल्या

मला याहून नव्हती का निराळी हाव आयुष्या?अरे शब्दातुनी माझ्या व्यथेला वाहता आले

जरी अश्रृंबरी होता तुझा मज्जाव आयुष्यातुला माझ्या तहानेने जरा मागीतले मृगजळ

तिच्या केलास नावे तू उन्हाचा गाव आयुष्या--------------------------------------------------------------


 ( 9 )


बघतो तेथे भाकर दिसते

भुकेल्यास जग धूसर दिसतेयाद तुझी आल्यावर, दुनिया

आहे त्याहुन सुंदर दिसतेत्याचे मंदिर इथून दिसते

तिथून माझेही घर दिसतेचांदण्यात ती गोड लाजता

ओली वाळू साखर दिसतेक्षितिजाच्या सीमेहुन बघतो

मृगजळ साले कुठवर दिसते--------------------------------------------------------------


 ( 10 )


जातीने वरचढ आहे ना धर्माने धड आहे

मी इथल्या मानवतेच्या भाग्याची पडझड आहेखर्चितो पिठाचे पैसे मग मेंदू तर्तर होतो

मी भटक्या संसारातिल सांजेची बडबड आहेव्याकूळ गाढवाठाई विश्वाचा जनिता दिसतो

मी नाथांच्या खांद्याची कनवाळू कावड आहेथोड्याच गुलालाने मग धन्यता मिळे धाग्यांना

मी कुठल्या प्रेतावरचे पांढुरके कापड आहे--------------------------------------------------------------( 11 )काळजी रोज पोटपाण्याची

काय चाटू लकेर गाण्याचीदुःख आताच लावले झोपी

गोष्ट सांगून पीक-पाण्याचीकाय दोन्हीकडून बोलू मी

एक बाजू बघून नाण्याचीचोच ज्याने तुला दिली चिमणे

त्यास चिंता असेल दाण्याचीशब्द शालीन हुंदके देती

वेदना कोणत्या घराण्याची?हाच होवो कमावता अश्रू

वेळ येवो बसून खाण्याची


--------------------------------------------------------------[ Marathi Shayar - satish darade ]


 ( 12 )


तर्जनी कापून रात्री रेखिली भिंतीवरी

मी तुझी कित्येक चित्रे काढली भिंतीवरीसोडुनी हॉस्टेल गेली बॅच यंदाची पुढे

एक चारोळी कुणाची राहिली भिंतीवरी...एकही नव्हता झरोका ठेवला उघडा तरी

चांदण्याची धूळ कोठुन साचली भिंतीवरी?बांधते पड़ी सकाळी बायको बोटास त्या

बाटली रात्रीच ज्याने फोडली भिंतीवरीपारदर्शक जाहलो की काय मीही आतुनी

का बरे माझी पडेना सावली भिंतीवरी?--------------------------------------------------------------( 13 )सांगते भूक आणि गातो मी

रोज तंद्री विकून खातो मीताठ नाही कणाबिणा माझा

तू दिलेलाच भाव खातो मीआसवांनी क्षितीज ओघळते

बाट जेव्हा तुझी पहातो मीभासतो धूर जाळपोळीचा

या धुक्याने भ्रमात जातो मीघाम फोडी फुलायचा धसका

लोक म्हणती दवात न्हातो मी--------------------------------------------------------------


 ( 14 )


फाटकी कोणी दिली झोळी तुला

घे सुई घे... की हवी पोळी तुलाबोलली गर्भार, घेताना उडी

ही नदी नेईल आजोळी तुलापाहिला संसार माझा जवळुनी

समजली आहेच रांगोळी तुलासर्व येथे बंद कानाची घरे

द्यायची कोणास आरोळी तुलाकाटक्या होऊन मिसरे पांगले

बांधता येईल का मोळी तुला?हात की ते दात चिमणीचे तुझे

यायची फोडायला गोळी तुला...--------------------------------------------------------------
( 15 )आण दरवेळी अटळ राहू नये

प्रेम इतकेही उथळ राहू नये...जोम यावा आपल्या चर्चेमुळे

ती शिळोप्याची बरळ राहू नयेयाचसाठी भोग सारे भोगतो

एकही म्हातारचळ राहू नयेआयते फळ खायची लागे सवय

नेहमी झाडाजवळ राहू नये...ओड कसलीही असो नात्यामधे

फक्त हंगामी भुरळ राहू नये...--------------------------------------------------------------


 ( 16 )


अंतरी तेजाळणारे सल हवे

भाग्य दुःखाचे सदा उज्ज्वल हवेसाठल्या ग्रंथी विषाच्या ज्या मुखी

अंग त्याचे नेहमी शीतल हवेबाभळीचे फूल कानी घालते

वेगळे कसले तिला कुंडल हवेवासना आदीम होऊ लागता

सारखे डोळ्यांपुढे जंगल हवेलंगड्याला मोडकी काठी हवी

दुर्बळाला दानहीं दुर्बल हवे...--------------------------------------------------------------


 ( 17 )


हवेतिल चुंबनाचा कोवळा अनुराग आठवतो

उमटला जो धुक्यावर तो गुलाबी डाग आठवतोविरक्ती पोक्त झाल्यावर सुचे गाभूळ आसक्ती

उपाशी राहनी पक्षी जसा फळबाग आठवतोमला हकनाक छेडाया कधी एकांत आला तर

कुठेही काढला नाही, मला तो राग आठवतोजरी डोईवरी माझ्या भ्रमाची सावली पडली

तरीही काहिसा अपुल्या कथेचा भाग आठवतोखलाशांनो कशी खाऊ फळे नौकेवरी सांगा

बिया फेकून देताना मला भूभाग आठवतो--------------------------------------------------------------


 ( 18 )


कोणी न साव येथे तू ही दडू नको

चोरात मोर होऊ... तू ओरडू नकोकुठल्या परंपरेचा नाही गुलाम मी

तूही कुण्या प्रथेच्या हाती पडू नकोमाझ्या समूळ नोंदी डोळ्यांमधे तुझ्या

मी नामशेष होइल इतके रडू नकोदेवा सदैव आपण खेळू लपालपी

मी शोधण्यास येता तू सापडू नकोपकडू कुण्या फुलाची गुपचूप तर्जनी

माझा वसंत म्हणतो तू बागडू नकोकाळा तुझ्या गतीशी बांधून घेतले

आता पळू नको वा मागे पडू नकोमाझा जुना शहारा परतून दे मला

नुसतेच पाकळ्यांवर दव शिंपडू नको--------------------------------------------------------------


 ( 19 )


पायास बांधुनी चकवा डोळ्यात घेउनी वणवा

गर्भात युगाच्या माझी शोधीत हिंडतो अफवाचल बोट धरू बान्याचे, सापडू गाव ताऱ्यांचे

चल तिथे पोच्या जेथे काळाला येतो थकवाजर वाट तिची बघताना जन्माची संध्या झाली

तर प्रेताच्या डोळ्यातिल आशेची किरणे विझवाफासास लटकुनी गेला स्वप्नाळ सुगीचा स्वामी

जन्माचा सरवा बेचित रानात हिंडते विधवामग रात्रीपुरते माझ्या चोचीत चांदणे पडले

मी चकोर होउन जाता चंद्राचा गेला रुसवा--------------------------------------------------------------


 ( 20 )


तीच काहिली, तीच होरपळ या जन्मीही

कोळुन कोळुन प्यालो मृगजळ या जन्मीहीही कुठल्या मैनेच्या गंधाने घमघमते

पळसाची संन्यस्त पानगळ या जन्मीहीमाझ्या ठिपक्याची पडते घनगर्द सावली

इतके देते ऊन्ह पाठबळ या जन्मीहीभटकंतीचे फळ घेउन गुंगारा देती

माझ्या दाही दिशा वायफळ या जन्मीहीएका देहानेही मी बहुपेडी जगतो

माझा आत्माबित्मा ढोबळ या जन्मीहीनिघेल एखाद्याशी प्राचिन परिचय तेव्हा

उठेल हृदयी एखादी कळ या जन्मीही--------------------------------------------------------------


 ( 21 )


अक्षर अक्षर मायेने कुरवाळत बसतो

मी तान्ह्या कवितेचे जावळ हुंगत बसतोबोळ्यागत पिळतो पाण्यातुन चंद्र काढुनी

मग डोहाच्या काठी दारू गाळत बसतोअंकुरल्यावर माझी उघडी पडतिल दुःखे

म्हणून मी जमिनीला टाके घालत बसतोकडूनिंब जो जंगलकाठावर आहे तो

वणव्याला झाडाच्या जाती सांगत बसतोमला भेटण्यासाठी क्षितीज येते तेव्हा

इंद्रधनू का माझी मफलर पाहत बसतो--------------------------------------------------------------


 ( 22 )


जनता भनंग इथली सत्ता धनिक भाऊ,

विकसित देश माझा मी नागरिक भाऊ!अमुची सुगी ऋतूंच्या गेली घश्यात सारी,

तुमच्या बरे निघाले खुर्चीत पिक भाऊ!तो भूतकाळ तोडू हा वर्तमान जोडू,

थोडे करु आता हे आयुष्य ठिक भाऊ!बांधावरी बसा अन एक-एक थेंब मोजा,

पाऊस म्हणे पिकाला देतोय भिक भाऊ!नुसत्याच अक्कलीवर श्रीमंत कोण होतो,

पैश्या शिवाय असतो मेंदू पडीक भाऊ!--------------------------------------------------------------


 ( 23 )


मनाच्या खिन्न देठाचे कुणी नैराश्य खुडले तर

बघू तेव्हातरी काही सुगंधी शेर सुचले तर...मला भिंतीमधे ऐसा रुजू देऊ नको देवा

तुझा तडकेल गाभारा ऋतूंनी कान भरले तरतिथे तीही सुखी आहे, इथे मीही सुखी आहे

असे सांगून देतो मी मला कोणी हटकले तरतिची जेथेतिथे तुलना तुझ्याशी मी करावी का

तुझ्या ताटातुटीनंतर कुणाशी सूत जुळले तर?--------------------------------------------------------------( 24 )उष्णता की गारवा माहीत नाही

वाहते कसली हवा माहीत नाहीएक स्वच्छंदी पिलू माझ्यात आहे

ज्यास कुठलाही थवा माहीत नाहीलागला आहे रचू तो सूर्यस्तोत्रे

ज्यास साधा काजवा माहीत नाहीतूच दारिद्र्या गुढी दारी उभी कर

या घराला पाडवा माहीत नाहीभाजतो जो तो इथे भाकर स्वत:ची

मांडला कोणी तवा माहीत नाही


--------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments